एलटी फूड्सच्या शेअरमध्ये 11 टक्के वाढ

वृत्तसंस्था
बुधवार, 7 डिसेंबर 2016

मुंबई: एलटी फूड्सने दक्षिण भारतात तांदळाच्या विक्रीसाठी किशोर बियाणींच्या फ्युचर कन्झ्युमरसोबत करार केला आहे. यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये आज इंट्राडे व्यवहारात तब्बल 11 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. फ्युचर कन्झ्युमरने एलटी फूडससोबत जेनोआ राइस मिल्ससोबतदेखील करार केला आहे. एलटी फूड्स आणि फ्युचर कन्झ्युमरची जेनोआमध्ये प्रत्येकी 50 टक्के भागीदारी असणार आहे.

" फ्युचर कन्झ्युमरने सोना मसुरी/प्रादेशिक दक्षिण भारतीय तांदळाचे उत्पादन, मार्केटिंग, विक्री आणि वितरणासाठी एलटी फूड्स आणि जेनोआ राइस मिल्ससोबत करार केला आहे", अशी माहिती फ्युचर कन्झ्युमरने शेअर बाजारात दिली आहे.

मुंबई शेअर बाजारात एलटी फूड्सचा शेअर सध्या(बुधवार, 11 वाजून 20 मिनिटे) 281.60 रुपयांवर व्यवहार करत असून 5.47 टक्क्यांनी वधारला आहे.

Web Title: LT Foods forms JV with Future Consumer to sell rice