‘लुपिन’च्या नैराश्यावरील औषधास ‘यूएसएफडीए’ची मान्यता

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

नवी दिल्ली: लुपिनला आणखी एका औषधासाठी अमेरिकी अन्न औषध प्रशासनाची (यूएसएफडीए) मंजुरी मिळाली आहे. कंपनीच्या नैराश्यावर उपचार करणार्‍या जेनेरिक औषधास मंजुरी मिळाली आहे.

''यूएसएफडीए'कडून 12.5 मिग्रॅ, 25 मिग्रॅ आणि 37.5 मिग्रॅ औषधाची मात्रा असलेल्या औषधांच्या विक्रीस परवानगी देण्यात आली आहे,'' असे लुपिनने बीएसईला सादर केलेल्या अहवालात सांगितले आहे. कंपनी लवकरच उत्पादनाची जाहिरात करणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

औदासिन्य आणि महिलांना मासिक पाळी येण्याअगोदर होणार्‍या मानसिक बदलांवर उपचारासाठी हे औषध उपयोगी आहे. या सकारात्मक बातमीमुळे आज (सोमवार) मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर वधारला होता. शेअरने आज इंट्राडे व्यवहारात 1494 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली.

सध्या मुंबई शेअर बाजारात लुपिनचा शेअर 1483.70 रुपयांवर व्यवहार करत असून 18.70 रुपयांनी म्हणजेच 1.28 टक्क्यांनी वधारला आहे. दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 1294.05 रुपयांची नीचांकी तर 1911.55 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.66,950.83 बाजारभांडवल आहे.

Web Title: Lupin gets USFDA nod for generic anti-depressant tablets