महिंद्रा ॲण्ड महिंद्राचा अत्याधुनिक ‘फ्युरिओ’ ट्रक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

पुणे - महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीकडून ‘फ्युरिओ’ हा अत्याधुनिक ट्रक मंगळवारी बाजारात दाखल झाला. चाकण येथील महिंद्रा वाहन उत्पादन प्रकल्पात या ट्रकचे उद्‌घाटन झाले. या वेळी महिंद्रा ॲण्ड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे अध्यक्ष राजन वधेरा, ट्रक आणि बस उत्पादन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद सहाय यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महिंद्रा ॲण्ड महिंद्रा लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोयंका हेदेखील उपस्थित होते. इटली येथील ‘पिनीनफरीना’ कंपनीने या ट्रकच्या केबीनचे डिझाईन केले आहे.

पुणे - महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीकडून ‘फ्युरिओ’ हा अत्याधुनिक ट्रक मंगळवारी बाजारात दाखल झाला. चाकण येथील महिंद्रा वाहन उत्पादन प्रकल्पात या ट्रकचे उद्‌घाटन झाले. या वेळी महिंद्रा ॲण्ड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे अध्यक्ष राजन वधेरा, ट्रक आणि बस उत्पादन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद सहाय यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महिंद्रा ॲण्ड महिंद्रा लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोयंका हेदेखील उपस्थित होते. इटली येथील ‘पिनीनफरीना’ कंपनीने या ट्रकच्या केबीनचे डिझाईन केले आहे. वातानुकूलित केबिनमध्ये सहा शिफ्ट गिअर, ‘टर्बो’ पर्यायासह अत्युच्च क्षमतेचे कमी डिझेलमध्ये जास्त मायलेज देणारे इंजिन, जादा क्षमतेचे वजन वाहून नेण्याची क्षमता, तसेच विविध रंगांमध्ये ट्रक विक्रीसाठी दाखल केले आहेत. देशभरात सुमारे १०० हून जास्त विक्रेते, १४९ अधिकृत सर्व्हिस सेंटर, २ हजार ९०० सर्व प्रमुख रस्त्यांवर सहयोगी केंद्रे, १ हजार ६०० सुटे भाग विक्री केंद्र उभारण्यात आले आहेत. फ्युरिओ ट्रक उत्पादनासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahindra and mahindra florio truck