Budget 2020 : शिक्षण क्षेत्रासाठी ९९ हजार ३०० कोटींची भरीव तरतूद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शनिवार) नव्या दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासाठी घोषणा करण्यात आल्या. यावेळी त्यांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी शिक्षण क्षेत्रासाठी ९९ हजार ३०० कोटींची भरीव तरतूद केली. यापैकी ३ हजार कोटी कौशल्य विकासासाठी देणार असल्याचे सितारामण म्हणाल्या.

 

शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या ठळक घोषणा-

- दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध

- शिक्षण क्षेत्रासाठी नवीन धोरण तयार करणार

- नॅशनल पोलिस युनिवर्सिटी

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शनिवार) नव्या दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासाठी घोषणा करण्यात आल्या. यावेळी त्यांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी शिक्षण क्षेत्रासाठी ९९ हजार ३०० कोटींची भरीव तरतूद केली. यापैकी ३ हजार कोटी कौशल्य विकासासाठी देणार असल्याचे सितारामण म्हणाल्या.

 

शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या ठळक घोषणा-

- दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध

- शिक्षण क्षेत्रासाठी नवीन धोरण तयार करणार

- नॅशनल पोलिस युनिवर्सिटी

- सायबर फॉरेन्सिक सायन्स युनिवर्सिटी

- वैद्यकीय महाविद्यालय पीपीपी तत्वावर जिल्हा रुग्णालयांशी जोडणार

- मार्च 2025 पर्यंत डिप्लोमासाठी 150 संस्था सुरू करणार

- आघाडीच्या १०० मध्ये असणाऱ्या शिक्षण संस्थांकडून डिजीटल शिक्षण उपलब्ध करणार

- उच्च शिक्षणासाठी परदेशातून भारतात येणा-यांसाठी IND SAT प्रवेश परिक्षा

- मेडिकल आणि नर्सिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ब्रिज कोर्स तयार करणार

-  कौशल्य विकास व दर्जेदार शिक्षणाला चालना देण्यासाठी विदेशी गुंतवणुकीला परवानगी.

 

Image may contain: 1 person, text that says 'शिक्षण सकाळ BUDGET 2020-21 99 हजार 300 कोटींची तरतूद गरिबांना दर्जेदार शिक्षण पुरविणार शिक्षण क्षेत्रातही थेट परकी गुंतवणूक (एफडीआय) आणणार उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणार चांगले डॉक्टर तयार करण्यासाठी विद्यापीठ सुरु होणार मार्च 2025 पर्यंत डिप्लोमासाठी 150 संस्था सुरु करणार नॅशनल विद्यापीठ सुरु करणार eSakal.com'

 

- Budget 2020 : अर्थसंकल्पापूर्वीच शेअर बाजारात घसरण

 

अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

- भारतातील जनतेने आमच्यावर विश्वास दाखविला आणि मोदींना मोठ्या मताने निवडून दिले

- भारतातील जनतेने आमच्यावर विश्वास दाखविला आणि मोदींना मोठ्या मताने निवडून दिले

- जनादेशाद्वारे आम्ही लोकांची सेवा करत आहे

- भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत

- मे महिन्यात मोदींना मोठा जनादेश मिळाला

- देशाच्या आकांक्षेचा हा अर्थसंकल्प आहे

- आमचे लक्ष्य देश आणि नागरिकांची सेवा आहे

- जीएसटी हे देशासाठी ऐतिहासिक पाऊल आहे

- जीएसटीचे पाऊल ऐतिहासिक, इन्स्पेक्टर राज मोडीत काढले

- जीएसटीने आता पाळेमुळे मजबूत केली आहेत

- जीएसटी लागू करून रचनात्मक बदल केले

- वस्तू व सेवा करांची मोठी मदत होत आहे

- सबका साथ, सबका विकास यामुळे देशातील प्रत्येक गरिब नागरिकांपर्यंत योजना पोहचत आहेत

- जीएसटीमुळे 60 लाख नवीन करदाते जोडले गेले

- प्रणालीद्वारे 800 कोटी नवीन इन्व्हॉईस भरले गेले

- अरुण जेटली जीएसटीचे मुख्य शिल्पकार आहेत

-  40 लाख नागरिक जीएसटी परतावा भरतात

- गरीब आणि गरजूंना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेद्वारे फायदा पोचवला. उदा. आयुषमान भारत योजना, उज्ज्वला योजना

- महागाई नियंत्रणात ठेवण्यात सरकारला यश आले

- रोजगार देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे

- बँकाची स्थिती चांगली आहे

- महागाई नियंत्रणात असून, बँकांना भांडवल पुरवठा करून अर्थव्यवस्थेला बळ देण्यात आले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: major announcements for education sector in union budget of india