मलकापूर बँकेचे तब्बल ७० टक्के कर्ज एनपीए! खातेदार मागतायत पैसे

निष्क्रिय असलेल्या अधिकाऱ्यांना बॅंकेतर्फे नोटिसा बजविण्यात आल्या आहेत.
NPA
NPA

औरंगाबाद : दी.मलकापूर सहकारी बँकेतर्फे (The Malkapur Cooperative Bank) वाटण्यात आलेल्या कर्जापैकी ७० टक्के कर्ज हे एनपीए (NPA) झाल्याने बँकेची आर्थिक स्थिती ढासळली होती. त्यामुळेच आरबीआयने बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले. या संदर्भात निष्क्रिय असलेल्या अधिकाऱ्यांना बॅंकेतर्फे नोटिसा बजविण्यात आल्या आहेत. दुसरीकडे मेहनतीची कमाई बुडते की काय या भितीपोटी पैसे काढण्यासाठी खातेदार बँकेत चकरा-मारत आहेत. यात शस्त्रक्रिया, लग्न समारंभ आणि मुलांच्या शिक्षणाची फिस भरण्यासाठी बँकेत ठेवलेल्या पैशांची मागणी केली जात आहे. बँकेतर्फे युध्दपातळीवर बँक पूर्वपदावर आणि हे निर्बंध हटविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. बँकेत येणाऱ्या प्रत्येक खातेदार एक महिन्यात रिकव्हरी करीत निर्बंध हटविण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दिले जात आहे. शस्त्रक्रीयेसाठी बँकेत ठेवलेले पैसे मिळावेत यासाठी दोन ते तीन अर्ज (Aurangabad) गुलमंडी, तसेच टिव्ही सेंटर येथील शाखेत आले आहेत. (Banking News)

NPA
‘रिलायन्स कॅपिटल’चे संचालक मंडळ बरखास्त

यासह लग्नसमारंभासाठी व मुलांचे शैक्षणिक फिस भरण्यासाठी पैशांच्या मागणीचे अर्ज आले असल्याची माहिती गुलमंडी शाखा व्यवस्थापकाने दिली. हे सर्व माहिती बँकेचे मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. तेथून ते अर्ज आणि माहिती ही आरबीआयला पाठविण्यात येणार आहे. दुसरीकडे बँकेतर्फे क्षमतेपेक्षा जास्त कर्ज वाटप करण्यात आले आहेत. मराठवाड्यातील वेगवेगळ्या शाखेतून औद्योगिक कर्ज दिले असल्याने एनपीए थकल्याने निर्बंध लागल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.

प्रत्येक शाखेत ग्राहकांच्या चकरा

शहरातील सहा शाखांमध्ये ग्राहक रोज पैसे मिळतील या आशेने चकरा मारत आहेत. प्रत्येक शाखेत दिवसभरातून ५० ते १०० खातेधारक भेटी देत ठेवी विषयी विचारणा करीत आहे. रोज आरबीआयच्या निर्देशानुसार दहा हजार रुपये पर्यंत रक्कम ग्राहकांना देत आहे. आरबीआयने वेळोवेळी बँकेला दिलेली निर्देशानाचे पालनही बँकेने अनेक वेळा केले नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com