मल्ल्यांच्या मालमत्ता जप्तीवर न्यायालयाचे शिक्कामोर्तब

वृत्तसंस्था
शनिवार, 3 डिसेंबर 2016

नवी दिल्ली: उद्योगपती विजय मल्ल्यांविरोधात सुरु असलेल्या करचुकवेगिरी प्रकरणात करचुकवेगिरी प्रतिबंधक विशेष न्यायलयाने 1,411 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्याच्या सक्तवसुली संचलनालयाच्या(ईडी) आदेशावर शिक्कामोर्तब केले आहे.

सक्तवसुली संचलनालयाने जून महिन्यात यासंबंधी कर चुकवेगिरी प्रतिबंध कायद्यांतर्गत जप्तीचा पहिला आदेश जारी केला होता. यामध्ये 34 कोटी रुपयांचा बँक बॅलेंस, बंगळुरु व मुंबई येथे एकेक फ्लॅट, तमिळनाडू येथील औद्योगिक भूखंड, कुर्गमध्ये कॉफीचा मळा, युबी सिटीमध्ये निवासी आणि व्यवसायिक बांधकाम क्षेत्र आणि बंगळुरु येथील किंगफिशर टॉवरचा समावेश आहे.

न्यायालयाच्या मंजुरीमुळे आता सक्तवसुली संचलनालयाला या मालमत्तांची मालकी प्राप्त होणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आतापर्यंत या प्रकरणात संस्थेने 8,041 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. करचुकवेगिरी प्रतिबंध कायद्याच्या संपुर्ण इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

Web Title: Mallya attainder court seal