मल्ल्यांचे प्रत्यार्पण लवकरच?

पीटीआय
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

मोदी-मे यांच्यात चर्चा; अन्य विनंत्याही मार्गी लागणार 
नवी दिल्ली - भारत आणि ब्रिटन यांच्यात गुन्हेगारांचे प्रत्यार्पण करण्याबाबत सहमती झाल्याने उद्योगपती विजय मल्ल्या यांचे प्रत्यार्पण लवकर होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. भारताने ब्रिटनकडे ५७ जणांचे प्रत्यार्पण करण्याची मागणी केली आहे. यात ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर व्यवहारातील दलाल ख्रिस्तियन मायकेल यांचाही समावेश आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यात आज झालेल्या चर्चेमध्ये प्रत्यार्पणाच्या प्रलंबित विनंत्याबाबत चर्चा झाली. यावर दोन्ही बाजूंचे अधिकारी थेट बैठक घेऊन मार्ग काढणार आहेत. ब्रिटनकडून १७ जणांच्या प्रत्यार्पणाच्या विनंत्या भारताकडे प्रलंबित आहेत. या चर्चेनंतर मल्ल्या यांचे ब्रिटनकडून भारताकडे प्रत्यार्पण लवकरात लवकर होईल, अशी भारताला आशा आहे. मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाचा विषयही विशेषकरून या चर्चेत उपस्थित झाला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. मल्ल्या यांच्याविरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावावी, अशी मागणी सक्त वसुली संचालनालयाने इंटरपोलकडे याआधीच केली आहे. 

ललित मोदी जाळ्यात येणार 
इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) माजी प्रमुख ललित मोदी हे सध्या ब्रिटनमध्ये आहेत. मल्ल्या यांच्याप्रमाणे त्यांनी ब्रिटनमध्ये आश्रय घेतला आहे. करचुकवेगिरी प्रकरणांमध्ये मोदी सक्त वसुली संचालनालयाला हवे आहेत. त्यांचे प्रत्यार्पणही लवकर होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Mallya extradition soon?