मँचेस्टर-मुंबई थेट विमानसेवा सुरू होणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 मे 2018

मुंबई : मुंबईहून मँचेस्टरला थेट विमानसेवा येत्या वर्षअखेरीपर्यंत सुरू होणार आहे. मँचेस्टर विमानतळ प्राधिकरणाने या विमानसेवेस हिरवा कंदिल दाखविला आहे. पहिल्या टप्प्यात 'जेट एअरवेज'ची विमानसेवा सुरू होईल. 

भारताच्या आर्थिक राजधानीपर्यंत थेट विमानसेवा असण्याबद्दल मँचेस्टर प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू होते. मँचेस्टर आणि परिसरामध्ये शंभरहून अधिक भारतीय कंपन्यांची कार्यालये आहेत. या मुंबई-मँचेस्टर विमानसेवेमुळे येथील अर्थव्यवस्थेस चालना मिळेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. 

याच वर्षाच्या सुरवातीस मँचेस्टर आणि भारतामध्ये सामंजस्य करार झाला होता. त्यामध्ये या विमानसेवेचाही उल्लेख होता. 'या थेट विमानसेवेमुळे मँचेस्टर भारताशी जोडले जाणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये ही सेवा सुरू होईल', असे प्रतिपादन मँचेस्टर विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्रयू कोवन यांनी केले. 

ही सेवा सुरू झाल्यानंतर दर आठवड्यास सुमारे आठ हजार प्रवासी प्रवास करू शकतील, अशी माहिती 'जेट एअरवेज'च्या विनय दुबे यांनी दिली.

Web Title: Manchester to Mumbai direct flight to start operating from year end