बॅंकांच्या शेअर्सची करामत

दिवाकर कुलकर्णी
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

गेले वर्षभर माफक मंदीच्या पण जोरदार तेजीच्या हिंदोळ्यावरील बाजाराची आंदोलने आपण अनुभवत आहोत. औषधे व बॅंकिंग सेक्‍टर वगळता इतर सर्वच सेक्‍टरमध्ये तेजीची चढण कमी-जास्त प्रमाणात आपण न्याहाळली आहे, मात्र बॅंकिंग सेक्‍टरच्या वाट्याला अनुत्पादित कर्जाचं निमित्त करून कधी सुगीचे दिवस येतच नव्हते. गेली ५-६ वर्षे रोज नवनवीन तळ बॅंकिंग समभाग दाखवत होते. संपूर्ण शेअर बाजाराला हा सेक्‍टर नावडीचा झाला होता.

गेले वर्षभर माफक मंदीच्या पण जोरदार तेजीच्या हिंदोळ्यावरील बाजाराची आंदोलने आपण अनुभवत आहोत. औषधे व बॅंकिंग सेक्‍टर वगळता इतर सर्वच सेक्‍टरमध्ये तेजीची चढण कमी-जास्त प्रमाणात आपण न्याहाळली आहे, मात्र बॅंकिंग सेक्‍टरच्या वाट्याला अनुत्पादित कर्जाचं निमित्त करून कधी सुगीचे दिवस येतच नव्हते. गेली ५-६ वर्षे रोज नवनवीन तळ बॅंकिंग समभाग दाखवत होते. संपूर्ण शेअर बाजाराला हा सेक्‍टर नावडीचा झाला होता.

बाजारात काल उतरलेले, पदार्पण झालेले समभाग, उलाढालीत पुढे असायचे; पण ज्याची मूळं, २०० वर्षे मागं इंपिरिअल बॅंकेपर्यंत जातात, जी भारतातील सर्वात मोठी बॅंक आहे, जगातल्या ५० मोठ्या बॅंकांच्या मांदियाळीत जिची गणना होते, ३ लाख कर्मचारी, २४,४०० शाखा, ४२ कोटी ग्राहकवर्ग, जगातल्या ३१ देशांत अस्तित्व अशा आकडेवारीनं स्तिमित व्हायला होतं, त्या स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या वाट्याला फारसं कुणी जायचं नाही. क्वचितच एखाद्याच्या पोर्टफोलिओत स्टेट बॅंक शेअर अग्रभागात असायचा. बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ इंडिया, कॅनरा बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक या सार्वजनिक क्षेत्रातल्या इतर अग्रगण्य बॅंकांच्या बाबतीतही परिस्थिती फारशी वेगळी नव्हते. गेली काही वर्षं बॅंकिंग सेक्‍टर कानफाट्या ठरला होता.

पण हे कधीतरी थांबायला हवं होतं. भारतीय अर्थकारणाचा कणा असलेल्या या सेक्‍टरला असं सतत डावललेलं देशाला परवडणारं नव्हतं आणि सरकारनं (उशिरा का होईना) मंगळवारी या क्षेत्राला २.११ लाख कोटी मूल्याचा अधिक समभाग भरणा (कॅपिटल इन्फ्युझन) जाहीर केला. जणू पाठीवर हात फिरवून फक्त ‘तू लढ’ असं हे म्हणणं होतं! आणि तोबा, तोबा, तोबा...! बाजार त्या दिवशी बॅंकिंग सेक्‍टर, जो काही उसळला, त्याला तोड नाही. न भूतो न भविष्यती! शेजारील तक्ता पाहा म्हणजे कल्पना येईल.
मूळ बीएसई साईटवर जाहीर झालेला तक्ता ऐतिहासिक म्हणता येईल, व्हॉटस्‌ॲपवर तो फिरत होता.

पुढं दोन-तीन दिवस वरील दर थोडेसे खाली आले. पण बाजार ‘पीएसयू’ बॅंकांबाबत नक्कीच आशावादी आहे, असं म्हणता येतं. वर्षातील सर्वोच्च भाव अद्याप यायचे आहेत. सध्याचे दर सर्वोच्च भावाच्या १५ ते २० टक्‍क्‍यांनी खाली आहेत. तेवढी गॅप ५-६ महिन्यांत भरून येऊ शकते. असो!
गेल्या आठवड्यात दोन्हीही निर्देशांक आतापर्यंतच्या त्यांच्या सर्वोच्च आकड्यांना शिवले. नंतर थोडे माघारीही फिरले व अनुक्रमे ३३१५७ व १०३२३ वर बंद झाले. नजीकच्या काळात ३३,५००/१०४५० हे आकडे पार करणं निर्देशांकांना अवघड वाटू नये.

रिलायन्स निफॉन लाईफचा १५४० कोटींचा प्रारंभिक भागविक्रीचा इश्‍यू ८१ पट अधिक भरला गेला. २४७ ते २५२ किंमत पट्टा होता. किरकोळ भागदारांचा आरक्षित भाग मात्र ५ पटच भरला गेला आहे. करड्या बाजारात ८५ रु. (३४ %) अधिमूल्य आजच्या तारखेला आहे. २००८ साली आलेल्या अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरने त्यावेळी गुंतवणूकदार (आजतागायत) चांगले पोळलेले आहेत. या वेळी तसे न होवो म्हणजे मिळवले!

पाठोपाठ महिन्द्रा लॉजिस्टिक (८२९) कोटी), न्यू इंडिया ॲश्‍युरन्स, एचडीएफसी स्टॅंडर्ड लाईफ इश्‍यू येत आहेत. महिंद्र, एचडीएफसी चांगले बोलले जाते. सोमवारी इन्फोसिस बायबॅक साठी खरेदी करू शकतो. अवंती फीडस्‌ (२८५९), बजाज ॲटो (३२८९), भारत फोर्ज (६७१), इआयडीपॅरी (३७१), इमामी (१२४३), गेल (४७१), मारुती (८११४), मेघमणी ऑरगॅनिक (१०८), पोलॅरिस (२८६), सारेगम (६६०), टाटा ग्लोबल (२२०), टाटा स्टील (७२६) रोज तेजीची नवनवीन शिखरं गाठत आहेत. धुत इंड. फायनान्स ब्रेक आऊट देण्याच्या मनःस्थितीत आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीत नवीन विक्रम होत आहेत. आपण मगे पाहू नये.

Web Title: Maraket watch by Divakar Kulkarni