बॅंकांचे प्रमुख आता चौकशीच्या फेऱ्यात

पीटीआय
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) १२ हजार ७०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी गंभीर गैरव्यवहार तपास विभागाने (एसएफआयओ) ३१ बॅंकांच्या प्रमुखांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. यामध्ये आयसीआयसीआय बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि ॲक्‍सिस बॅंकेच्या प्रमुख शिखा शर्मा यांचा समावेश आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी यांच्या कंपन्यांशी आर्थिक देवाणघेवाण करणाऱ्या ३१ बॅंकांच्या प्रमुखांना ‘एसएफआयओ’ने चौकशीसाठी मुंबईतील कार्यालयात पाचारण केले आहे. यामध्ये आयसीआयसीआयच्या प्रमुख चंदा कोचर आणि ॲक्‍सिस बॅंकेच्या प्रमुख शिखा शर्मा यांचा समावेश आहे. एखाद्या गैरव्यवहारानंतर बॅंकांच्या प्रमुखांना अशा प्रकारची चौकशीसाठीची पत्रे पाठविण्यात येतात. हा नेहमीच्याच तपास प्रक्रियेचा भाग आहे. 

श्रीनिवासन यांची उपस्थिती 
ॲक्‍सिस बॅंकेचे उपव्यवस्थापकीय संचालक व्ही. श्रीनिवासन ‘एसएफआयओ’च्या कार्यालयातून आज दुपारी बाहेर पडताना दिसले. याविषयी सूत्रांनी सांगितले, की संबंधित अधिकारी बॅंकेच्या कर्ज विभागाची जबाबदारी सांभाळणारे असून, सर्व खात्यांची माहिती असल्याने ते तपासात मदत करीत आहेत. 

शेअर बाजाराने खुलासा मागविला 
‘एसएफआयओ’ने आयसीआयसीआय बॅंक आणि ॲक्‍सिस बॅंकेच्या प्रमुखांना चौकशीसाठी बोलाविल्याने याबाबत दोन्ही बॅंकांकडून मुंबई शेअर बाजाराने खुलासा मागविला आहे. ‘पीएनबी’तील गैरव्यवहाराचा तपास केंद्रीय अन्वेषण (सीबीआय) विभागासह अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतील सक्तवसुली संचलनालय (ईडी) ही केंद्रीय तपास यंत्रणा करीत आहे.

Web Title: marathi news bank PNB SFIO