'बिटकॉईन'ची चमक फिकी; महिनाभरात 15 टक्‍क्‍यांची घसरण 

Bitcoins
Bitcoins

लंडन : भारतासह चीन, रशिया या देशांनी बिटकॉईन अवैध ठरवल्यानंतर जागतिक बाजारात बिटकॉईनचे मूल्य झपाट्याने खाली आले. महिनाभरात बिटकॉईनचे मूल्य 15 टक्‍क्‍यांनी घसरले असून, ते सहा हजार 427 डॉलरपर्यंत खाली आले आहे.

जानेवारीपासून बिटकॉईनमधील घसरणीमुळे जवळपास 500 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. 

गेल्या दोन महिन्यांत 20 हजार डॉलरच्या ऐतिहासिक उच्चांकावर गेलेल्या बिटकॉईनमधील तेजी ओसरू लागली आहे. भारतासह अनेक देशांनी बिटकॉईनला अवैध ठरवले आहे. सोशल मीडियातील कंपन्यांनी बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी चालवणाऱ्या कंपन्यांना जाहिरात करण्यास मज्जाव केला आहे.

युरोपातील बॅंकांनी अमेरिकी बॅंकांप्रमाणे ग्राहकांना क्रेडिट कार्डने बिटकॉईन व्यवहार करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे बिटकॉईनची विश्‍वासार्हता धोक्‍यात आली आहे. परिणामी, बिटकॉईन गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याला प्राधान्य दिले आहे. गेल्या महिनाभरात बिटकॉईनचे मूल्य 10 हजार डॉलरवरून सहा हजार 427 डॉलरपर्यंत घसरले आहे. भारतात बिटकॉईनचा भाव 4 लाख 50 हजार रुपयांच्या आसपास आहे. 

तेजी ओसरू लागली 
गेल्या वर्षभरात बिटकॉईनचे मूल्य तब्बल 900 टक्‍क्‍यांनी वाढले होते. डिसेंबरमध्ये बिटकॉईनने 20 हजार डॉलर इतक्‍या विक्रमी मूल्यापर्यंत मजल मारली होती. त्या वेळी जगभरातील गुंतवणूकदारांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, त्यानंतर बिटकॉईनमधील गुंतवणूक पॉंझी योजनांप्रमाणे असून, हा कृत्रिम फुगवटा असल्याचे जाणकारांनी सांगितले.

अनेक देशांनी बिटकॉईनला बेकायदा ठरवल्यानंतर बिटकॉईनची चमक फिकी पडू लागली आहे. जगभरात बिटकॉईनचे मूल्य कमी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com