जेफ बेझोस ठरले जगात सर्वांत श्रीमंत 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जुलै 2017

न्यूयॉर्क : जगातील श्रीमंताच्या यादीत ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी पहिले स्थान पटकावले आहे. त्यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्‌स यांना मागे टाकले आहे. 

ब्लूम्बर्ग आणि फोर्ब्स या माध्यम संस्थांनी अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. ऍमेझॉन कंपनीच्या समभागात गुरुवारी 1.7 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाल्याने बेझोस हे प्रथमस्थानी जाणे सहजशक्‍य झाले आहे. कंपनीच्या समभागात वाढ झाल्याने बेझोस यांच्या संपत्तीत तब्बल 1.4 अब्ज डॉलर वाढ झाली. मागील चार महिन्यांत कंपनीच्या समभागात सुमारे 24 टक्के वाढ झाली आहे. बेझोस यांची एकूण संपत्ती 90.5 अब्ज डॉलर आहे.

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्‌स हे अब्जाधीशांच्या यादीत मे 2013 पासून अग्रस्थानी होते. त्यांच्यानंतर बेझोस यांचा क्रमांक लागत होता. आता बेझोस यांनी गेट्‌स यांना मागे टाकले आहे. गेट्‌स यांची एकूण संपत्ती 90 अब्ज डॉलर आहे. 
बेझोस हे ऍमेझॉनचे सहसंस्थापक असून, कंपनीचे 17 टक्के समभाग त्यांच्याकडे आहेत. ऍमेझॉन या ई-रिटेल कंपनीने ऍमेझॉन प्राइम ही व्हिडिओ सेवाही सुरू केली आहे. यासोबत कंपनीने ग्रोसरी चेन, क्‍लाउड कॉम्प्युटिंग, कॉम्प्युटिंग हार्डवेअर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रातही प्रवेश केला आहे. बेझोस यांची सर्वांत मोठी गुंतवणूक ऍमेझॉनमध्ये असून, त्यांच्या मालकीची ब्लू ओरिजिन ही खासगी अवकाश संस्था आहे. वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राची मालकीही त्यांच्याकडेच आहे. 

बिल गेट्‌स 22 पैकी 18 वर्षे प्रथम 
फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, गेट्‌स हे यादीत मागील चार वर्षे प्रथम होते. यादी सुरू झाल्यापासून 22 पैकी 18 वर्षे गेट्‌स यांनी यादीत पहिले स्थान कायम ठेवले होते. मेक्‍सिको दूरसंचार क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक कार्लोस स्लिम 2010 ते 2013 या काळात यादीत पहिले स्थान पटकावत गेट्‌स यांना मागे टाकले होते.

Web Title: marathi news business news Forbs jeff bezos bill gates