भिम ऍपवर मोठी कॅशबॅक ऑफर?

Representational Image
Representational Image

नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटकरता भिम ऍप्लिकेशनचा वापर करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त म्हणजेच 15 ऑगस्टला भिम ऍपचा वापर करून व्यवहार करणाऱ्यांना मोठी कॅशबॅक ऑफर मिळण्याची शक्‍यता आहे. भारत सरकारने डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) वतीने भिम ऍपची निर्मिती केली होती. हजार आणि पाचशेच्या नोटाबंदीनंतर डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी डिसेंबरमध्ये हे ऍप सुरू करण्यात आले होते. 

'एनपीसीआय'चे व्यवस्थापकीय संचालक (सीईओ) ए. पी. होटा यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, 'डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भिम ऍपचा वापर वाढावा, यासाठी 15 ऑगस्टला खास कॅशबॅकची ऑफर देण्यात येणार आहे.' सध्या भिम ऍप्लिकेशनचा वापर करणाऱ्यांना 10 ते 25 रुपये कॅशबॅक ऑफर दिली जाते. आता येत्या 15 ऑगस्टला ऍपवर यापेक्षा जास्त कॅशबॅक देण्याचा सरकार विचार करत आहे. 'कॅशबॅक'संबंधी प्रस्ताव सरकारकडे गेला असून, त्याला 15 ऑगस्टच्या आधी मान्यता मिळण्याची शक्‍यता आहे. 

सध्या देशात खासगी कंपन्यांचे अनेक ऍप्लिकेशन आहेत. ज्यामध्ये 'पेटीएम' आणि 'फोनपे' सारख्या ऍप्सचा समावेश होतो. 'पेटीएम' आणि 'फोनपे' सारख्या ऍप्सकडूनही ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर कॅशबॅक ऑफर देण्यात येते. 

भिम ऍपला चांगला प्रतिसाद 
हजार आणि पाचशेच्या नोटाबंदीनंतर डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी डिसेंबरमध्ये सुरू करण्यात आलेल्या भिम ऍपला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. देशात सध्या 1 कोटी 60 लाख लोकांनी ऍप डाऊनलोड केले असून, त्याचे 40 लाख ऍक्‍टिव्ह यूजर्स आहेत. एनपीसीआय लवकरच भिम ऍप 1.4 हे पुढील अपडेटेड व्हर्जन सादर करणार आहे. ज्याद्वारे भिम ऍपच्या मदतीने 'डिजिटल पेमेंट' करणे अधिक सोपे होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com