संकटांतून बँक ऑफ महाराष्ट्रात बाहेर पडेल : मराठे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

पुणे : ''राष्ट्रीयीकृत बँका सध्या विविध आव्हानांना तोंड देत आहेत. पण बँक ऑफ महाराष्ट्रने आव्हानांची भीती न बाळगता ते यशस्वीपणे स्वीकारले आहे. या संकटांतून बँक लीलया बाहेर पडेल. ग्राहकांची संतुष्टता हीच बँकेच्या अस्तित्वाशी निगडित आहे आणि आम्ही त्यादृष्टीने प्रयत्नशील आहोत,'' असे मत बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांनी व्यक्त केले. 

बँक ऑफ महाराष्ट्रच्या 83 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. पराग संचेती, बाळासाहेब फडणीस, विराज टिकेकर, दिनेश कुलकर्णी उपस्थित होते. बँकेच्या संस्थापकांना अभिवादन करण्यासाठी महाबँक कला क्रीडा मंडळ गेली 35 वर्षे रक्तदान शिबिर आयोजित करते. या रक्तदान शिबिरात दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व सिनेकलाकारांचाही सत्कार करण्यात आला. 

रक्तदान शिबिर ही काळाची गरज आहे, असे मत डॉ. संचेती यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक सुभाष सोमण यांनी, तर सूत्रसंचालन रवी जोशी यांनी केले. दीडशे रक्तदात्यांनी शिबिरात रक्तदान केले. 

Web Title: marathi news marathi websites Bank of Maharashtra Pune News