रद्द नोटांची मोजणी संपता संपेना 

पीटीआय
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर बॅंकांकडे जमा झालेल्या पाचशे व हजाराच्या रद्द नोटांची मोजदाद अद्याप रिझर्व्ह बॅंकेकडून सुरू आहे. रिझर्व्ह बॅंकेने माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे. 

रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे, की पाचशे रुपयांच्या 1 हजार 334 कोटी नोटा आणि एक हजार रुपयांच्या 524.90 कोटी नोटांची मोजदाद संपली आहे. या नोटांचे मूल्य अनुक्रमे 5.67 लाख कोटी आणि 5.24 लाख कोटी रुपये आहे. या नोटांचे एकूण मूल्य सुमारे 10.91 लाख कोटी रुपये आहे. यंत्रांच्या साह्याने दोन पाळ्यांमध्ये नोटांची मोजणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

नोटाबंदीनंतर जमा झालेल्या पाचशे व हजाराच्या रद्द नोटांची आकडेवारी रिझर्व्ह बॅंकेकडे माहिती अधिकारात मागविण्यात आली होती. तसेच नोटा मोजण्याच्या अंतिम मुदतीबाबत केलेल्या विचारणेवर रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे, की वितरणातून काढून घेतलेल्या नोटांची मोजणी करण्याची प्रक्रिया कायम सुरू राहणारी असते. नोटाबंदीनंतर बॅंकांकडे जमा झालेल्या रद्द नोटा मोजण्यासाठी 66 यंत्रांचा वापर करण्यात येत आहे. गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला सरकारने पाचशे व एक हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. या नोटा बॅंकांमध्ये जमा करण्यासाठी नागरिकांना 50 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. बॅंकांकडे जमा झालेल्या नोटांची मोजणी आणि तपासणी रिझर्व्ह बॅंकेकडून सुरू असून, यातील बनावट नोटा वेगळ्या काढण्यात येत आहेत. 

रिझर्व्ह बॅंकेने मागील आर्थिक वर्षातील अहवाल 30 ऑगस्टला जाहीर केला होता. त्यात पाचशे व हजाराच्या रद्द नोटांपैकी 99 टक्के नोटा बॅंकांकडे परत आल्याचे म्हटले होते. नोटाबंदीनंतर 15.44 लाख कोटी रुपयांपैकी 15.28 लाख कोटी रुपये परत आले असून, केवळ 16 हजार 50 कोटी रुपये परत आले नसल्याचेही रिझर्व्ह बॅंकेने अहवालात म्हटले होते. तसेच नव्या नोटांच्या छपाईसाठी 7 हजार 965 कोटी रुपये खर्च केल्याचेही रिझर्व्ह बॅंकेने नमूद केले होते. 

विरोधक-सत्ताधारी आमनेसामने 
नोटाबंदीला वर्ष पूर्ण होत असताना कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी 8 नोव्हेंबरला काळा दिवस पाळण्याची घोषणा केली आहे. नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेला बसलेला फटका जनतेसमोर मांडण्यासाठी विरोधक या दिवशी आंदोलन करणार आहेत. याला प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधारी भाजपने याचदिवशी काळा पैसाविरोधी दिन पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: marathi news marathi websites Demonetization Narendra Modi Reserve Bank of India