भारत बनणार पाचवी आर्थिक महासत्ता

वृत्तसंस्था
बुधवार, 27 डिसेंबर 2017

लंडन : येत्या आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक विकासदरात (जीडीपी) ब्रिटन आणि फ्रान्स या दोन आर्थिक महासत्तांना मागे टाकेल, असा अंदाज वर्तविला आहे. डॉलरच्या गंगाजळीमध्ये ब्रिटन व फ्रान्सला मागे टाकत भारत जगातील पाचवी आर्थिक महासत्ता होणार आहे. 

लंडन : येत्या आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक विकासदरात (जीडीपी) ब्रिटन आणि फ्रान्स या दोन आर्थिक महासत्तांना मागे टाकेल, असा अंदाज वर्तविला आहे. डॉलरच्या गंगाजळीमध्ये ब्रिटन व फ्रान्सला मागे टाकत भारत जगातील पाचवी आर्थिक महासत्ता होणार आहे. 

'द सेंटर फॉर इकॉनॉमिक्‍स अँड बिझनेस रिसर्च'ने (सीईबीआर) यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार आगामी वर्षात वीज आणि तंत्रज्ञान कमी किंमतीत उपलब्ध होऊन एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेत तेजी पाहायला मिळेल. याशिवाय, आशियाई देशांच्या अर्थव्यवस्था जागतिक बाजारपेठेत वर्चस्व गाजवतील. यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे महत्त्व वाढणार आहे. या एकूणच परिस्थितीमुळे आगामी 2018 वर्षात जगातील आघाडीच्या दहा अर्थव्यवस्थांच्या यादीत आशियाई देशांचे वर्चस्व असेल, असे या अहवालात सांगण्यात आले आहे. 

ब्रेग्झिटच्या धक्‍क्‍यातून सावरत असलेली ब्रिटनची अर्थव्यवस्था 2020 पर्यंत पुन्हा फ्रान्सला मागे टाकेल. तर रशियाचे जागतिक बाजारपेठेतील स्थान आणखी घसरेल. खनिज तेलाच्या कमी किंमतीला सरावलेली रशिया ऊर्जा क्षेत्रावरच मोठ्याप्रमाणावर अवलंबून राहील. मात्र, त्यामुळे नुकसान होऊन रशियाची अर्थव्यवस्था 11 व्या स्थानावरून 17 व्या स्थानापर्यंत खाली घसरेल, असे अंदाजही सीईबीआरच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे. 

सध्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्बंधांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास मंदावल्याचे चित्र आहे. तरीही भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटन आणि फ्रान्सला सहजपणे माघारी टाकेल आणि जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. 
डग्लस मॅकविल्यम्स, उपाध्यक्ष सीईबीआर 

2032 ला चीन बनणार महासत्ता 
या अहवालामध्ये जागतिक अर्थव्यस्थेत चीनचे वाढते महत्त्वही विषद केले आहे. 2032 पर्यंत अमेरिकेला मागे टाकून चीन जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. मात्र, अमेरिका आपले दुसरे स्थान अबाधित राखेल, असे निरीक्षण या अहवालात मांडण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उद्योग धोरणांमुळे अमेरिकेचे मोठे नुकसान होईल, असे अंदाज बांधण्यात आले होते.

Web Title: marathi news marathi websites Indian Economy British Economy