नोटाबंदीचे परिणाम सांगणे अवघड; केंद्रीय अर्थ मंत्रालयाची कबुली 

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

नवी दिल्ली : नोटाबंदीचे अर्थव्यवस्थेवर झालेले नेमके परिणाम सांगणे अवघड आहे, अशी कबुली केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंगळवारी दिली. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेत कोणतीही निष्क्रियता आलेली नाही, असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

अर्थ राज्यमंत्री पी. राधाकृष्णन लेखी उत्तरात राज्यसभेत म्हणाले, की भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ अनेक घटकांवर अवलंबून आहे. यात भांडवली गुतंवणुकीचा दर, बचत आणि तंत्रज्ञानाचा वापर यासह अनेक घटकांचा समावेश आहे. यामुळे नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेवर झालेले नेमके परिणाम सांगणे अवघडत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत कोणतीही निष्क्रियता निर्माण झालेली नाही. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत विकासदर 6.3 टक्‍क्‍यांवर पोचला. त्याआधीच्या एप्रिल ते जून या तिमाहीत तो 5.7 टक्के होता. 

गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला केंद्र सरकारने पाचशे व एक हजारच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. नोटाबंदीमुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. व्यापारी, तसेच लघू व मध्यम उद्योगांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे समोर आले होते. त्यामुळे नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेत निष्क्रियता आली होती का, अशी विचारणा सरकारकडे करण्यात आली होती. 

Web Title: marathi news marathi websites Indian Economy Demonetization Arun Jaitley Narendra Modi