प्राप्तिकर पूर्णपणे रद्द करावा : डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी

पीटीआय
गुरुवार, 11 जानेवारी 2018

नवी दिल्ली : केवळ परकी गुंतवणुकीच्या आधारे भारतीय अर्थव्यवस्था दहा टक्के विकासदर गाठू शकत नाही. यासाठी देशांतर्गत बचत गरजेची आहे. त्यामुळे सरकारने प्राप्तिकर पूर्णपणे रद्द करून मुदत ठेवींवरील व्याजदर 9 टक्‍क्‍यांवर न्यावा, असे मत भाजपचे नेते व खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी बुधवारी व्यक्त केले. 

'असोचेम'च्या 98 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वामी बोलत होते. ते म्हणाले, की विकासदराचे दोन आकडी उद्दिष्ट गाठण्यासाठी प्राप्तिकर रद्द करून बचत वाढविण्याचा गरज आहे. प्राप्तिकर रद्द झाल्यास देशात लोक उत्सव साजरा करतील. यामागे कारण प्राप्तिकर भरण्याला ते कंटाळले हे नसेल, तर ते अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळले आहेत हे असेल. राजकीय कारणांसाठीही या अधिकाऱ्यांचा गैरवापर होत आहे. कोळसा खाणी, स्पेक्‍ट्रम यांसारख्या मोठा महसूल मिळवून देणाऱ्या गोष्टींमधून प्राप्तिकराला पर्याय शोधता येईल. सरकारला महसुली उत्पन्नाचे विविध पर्याय वापरावे लागतील. 

भारतीय नागरिकांची बचत हे गुंतवणुकीचे पुनरुज्जीवन करण्याचे सर्वांत महत्त्वाचे साधन आहे. परकी गुंतवणुकीचा फायदा यामध्ये फारसा होत नाही. देशांतर्गत बचत तीन वर्षांपूर्वी एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या 35 टक्के होती. आता ती 29 टक्‍क्‍यांवर आली आहे. याला मुदत ठेवींवरील घटते व्याजदर कारणीभूत ठरले आहेत. भारतातील एकूण गुंतवणुकीत परकी गुंतवणुकीचा वाटा केवळ दोन टक्के आहे. तंत्रज्ञानाच्या बदलासह होणारी गुंतवणूक नसल्यास अर्थव्यवस्थेसाठी त्याचा उपयोग होत नाही, असे स्वामी यांनी नमूद केले. 

Web Title: marathi news marathi websites Indian Economy Income Tax