आता करचुकवेगिरी केली, तर कारवाई होणारच..!

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 जानेवारी 2018

नवी दिल्ली : काळ्यापैशाविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत प्राप्तिकर खात्याने करचुकवेगिरी करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखविणे सुरू केले असून, विद्यमान आर्थिक वर्षात आतापर्यंत तब्बल 2225 जणांवर प्राप्तिकर खात्याने गुन्हे दाखल केल्याचे अर्थखात्यातर्फे कळविण्यात आले आहे. 

गतवर्षी अशा प्रकारचे केवळ 748 गुन्हे दाखल करण्यात आले होते, परंतु चालू आर्थिक वर्षामध्ये, नोव्हेंबर 2017 पर्यंत यात 184 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्राप्तिकर खात्याने नोंदविलेल्या गुन्ह्यांची संख्या तब्बल 2225 वर जाऊन पोचली आहे.

विशेष म्हणजे, प्राप्तिकर खात्याकडे येणाऱ्या तक्रारींचेही प्रमाण 83 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. गेल्यावर्षी केवळ 575 तक्रारी आल्या होत्या. आता 1052 तक्रारी आल्या आहेत. करबुडव्यांविरुद्ध प्राप्तिकर खात्याच्या आक्रमक कारवाईमुळे न्यायालयाने दिवाळखोर जाहीर केलेल्यांचीही संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. नोव्हेंबर 2017 अखेरपर्यंत 48 जणांना न्यायालयाने दोषी ठरविले. त्याआधीच्या आर्थिक वर्षात असे दोषी ठरलेल्यांची संख्या केवळ 13 होती. 

परदेशात असलेले बॅंक खाते दडवून ठेवल्याबद्दल डेहराडून न्यायालयाने एका व्यक्तीला दिवाळखोर ठरविताना दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड आकारला, तर जालंधर येथे मुख्य कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी एक व्यापारी, वकील आणि साक्षीदाराला बनावट प्रमाणपत्रे सादर करणे, तसेच चुकीची माहिती देणे या गुन्ह्याखाली शिक्षा ठोठावली.

बेंगळूरमध्येही पायाभूत सुविधा प्रकल्पांचे काम करणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला 60 लाख रुपयांचा टीडीएस चुकविल्याबद्दल तीन महिने तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा ठोठावली. यासोबतच हैदराबाद, एर्नाकुलम, आग्रा येथेही करचुकवेगिरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याची उदाहरणे प्राप्तिकर खात्याने दिली आहेत. 

चालू आर्थिक वर्षात... 

  • 184 टक्के : गुन्हे दाखल करण्याच्या प्रमाणात वाढ 
  • 83 टक्के : तक्रारींचे वाढलेले प्रमाण 
  • 48 : जणांना शिक्षा
Web Title: marathi news marathi websites Indian Economy Income Tax