शेअर बाजारातील 'फ्री फॉल'ला किंचित ब्रेक

पीटीआय
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : नवी दिल्ली : सेन्सेक्स आणि निफ्टीमधील घसरणीस आज (बुधवार) काहीसा ब्रेक लागला. दिवसाची सुरवात होतानाच 'बीएसई'चा निर्देशांक ३६८ अंशांनी उसळला;. 'निफ्टी'मध्येही सुरवातीच्या ट्रेडिंगमध्ये ८० अंशांनी वाढ झाली.

तत्पूर्वी, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये सलग सहा सत्रांत झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी तब्बल दहा लाख कोटी रुपये गमावले आहेत. शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांना बसलेल्या 2.7 लाख कोटी रुपयांच्या फटक्‍याचाही यात समावेश आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स काल 561 अंशांनी घसरून 34 हजार 195 अंशांवर बंद झाला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 168 अंशांनी घसरून 10 हजार 498 अंशांवर बंद झाला होता. 

  • सेन्सेक्‍समध्ये मागील सहा सत्रांत 2 हजार 87 अंशांची घसरण 
  • सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल 9 लाख 90 हजार 476 कोटी रुपयांनी कमी 
  • सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारभांडवल 1 कोटी 45 लाख 22 हजार 830 कोटींवर 
  • 225 कंपन्यांचे समभाग मंगळवारी 52 आठवड्यांतील नीचांकी पातळीवर
Web Title: marathi news Mumbai stock exchange BSE NSE Dow Jones