Sensex थोडा उसळला; जोरात कोसळला #Budget2018

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

आज भांडवली बाजार उघडताच सेन्सेक्सने 150 तर निफ्टीने ५० अंकांनी वधारले आहे. त्यामुळे सेन्सेक्स ३६,१२७.२० च्या पातळीवर जाऊन पोहोचला तर निफ्टीने ११,६०७.२५ ची पातळी गाठली.

नवी दिल्ली : अरूण जेटली अर्थसंकल्प सादर करत असताना उसळलेला शेअर बाजार भांडवली उत्पन्नावर कराची घोषणा होताच धाड्कन कोसळला आहे. 

केंद्र सरकारकडून 2018-19 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर झाला. सादरीकरणाला सुरूवात होताच गुरूवारी भांडवली बाजाराने दीडशे अंशांनी उसळी घेतली. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 150 तर निफ्टी ५० अंशांनी वधारला.  त्यामुळे सेन्सेक्स ३६,१२७.२० च्या पातळीवर जाऊन पोहोचला तर निफ्टीने ११,६०७.२५ ची पातळी गाठली.

अर्थसंकल्पाचे संपूर्ण कव्हरेज इथे वाचा

मात्र, शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीवर कराची घोषणा होताच बाजार कोसळला. दीडशे अंशांनी उसळलेला बाजार तीनशे अंशांनी कोसळला. निफ्टीचा निर्देशांकही पन्नास अंशांनी कोसळला. 

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली 2018-19 या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करत आहेत. तत्पूर्वी सेन्सेक्स 150 अंकांनी वधारला आहे. त्यामुळे शेअर बाजारात उसळी मारली आहे. याशिवाय आशियाई शेअर बाजारांमध्येही तेजीची लाट दिसून आली आहे. तैवान, जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया या पूर्वेकडील देशांमधील शेअर बाजार सकाळी उघडल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर समभागांची खरेदी केली. 

#Budget2018: जसे सादर झाले तसे...

Web Title: Marathi News National News union budget Sensex budget 2018 arun jaitley narendra modi rail budget india agriculture