जगभरातील मार्केट्स का कोसळत आहेत?

Chinese Stock Exchange
Chinese Stock Exchange

मुंबई : जगभरात सुरू असलेल्या शेअर बाजारातील घसरणीचा जोरदार फटका भारतीय गुंतवणूकदारांनाही बसला आहे. गेले तीन दिवस सुरू असलेल्या या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 9.6 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

या पडझडीस भारताच्या अर्थसंकल्पाच्या आसपास सुरवात झाली. मुंबई स्टॉक मार्केटमध्ये अर्थसंकल्पानंतर आतापर्यंत 2,146.11 अंशांनी घसरला आहे. 'गुंतवणूकदारांनी अमेरिकी शेअर मार्केटमध्ये विक्रीचा सपाटा लावल्याचा परिणाम जगभरातील मार्केटवर झाला आहे. जागतिक पातळीवर झालेल्या या पडझडीचे परिणाम भारतीय शेअर मार्केटवरही होत आहेत', असे निरीक्षण 'जिओजिट फायनान्स सर्व्हिसेस'च्या व्ही. के. विजयकुमार यांनी नोंदविले. 

महत्त्वाचे म्हणजे, केवळ भारतीय शेअर मार्केटच कोसळले आहे, असे नाही. व्याजदर वाढविण्याच्या शक्‍यतेमुळे 'डाऊ जोन्स'ही 1,175 अंशांनी कोसळला होता. तसेच, जगभरातील महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांना यंदा महागाईचा फटका बसणार आहे, असा अंदाजही वर्तविण्यात येत आहे. याचाही परिणाम सर्वच महत्त्वाच्या शेअर मार्केट्‌सवर झाला आहे. अमेरिकेतील सरासरी वेतनवाढीचे प्रमाण 2.9 टक्के असल्याचे अधिकृत आकडेवारीतून समोर आल्यानंतर तेथील स्टॉक मार्केटवर त्याचा परिणाम झाला. 

जगातील बहुतांश अर्थव्यवस्था गुंतवणुकीसाठी आणि कर्जासाठी डॉलरवर अवलंबून आहेत. त्यामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेतील बदलांचा फटका सर्वांनाच बसतो. यामुळे वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे या अर्थव्यवस्थांवरही परिणाम होऊ शकतो. अमेरिकी अर्थव्यवस्था विकासाच्या दिशेने जाऊ लागल्यास विकसनशील देशांकडून अमेरिकेत होणाऱ्या आयातीच्या प्रमाणात वाढ होईल. त्यामुळे या देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असाही एक अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

दुसरीकडे, युरोपीय समुदाय मात्र व्याजदर वाढविण्याचा निर्णय लगेचच घेण्याच्या परिस्थितीत नाही. यामुळे डॉलरच्या तुलनेत युरोची 'किंमत' वाढत राहील आणि यामुळे युरोपीय देशांसाठी अमेरिकेला निर्यात करणे अवघड ठरू शकते. 

काय घडतंय.. 

  • आशिया आणि युरोपमधील स्टॉक मार्केट्‌स आज (मंगळवार) कोसळले. 
  • जपानमधील 'निक्की' 4.7 टक्‍क्‍यांनी, हॉंगकॉंगमध्ये 5 टक्‍क्‍यांनी तर लंडनमधील 'एफटीएसई' 3 टक्‍क्‍यांनी कोसळले 
  • अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने अमेरिकेतील व्याजदर वाढीची शक्‍यता ही 'डाऊ जोन्स'मधील घसरणीसाठीची मुख्य भीती. त्यातच अमेरिकेतील रोजगाराची स्थिती दर्शविणारी अधिकृत आकडेवारी शुक्रवारी जाहीर झाली. या दोन्हींचा एकत्रित परिणाम स्टॉक मार्केटवर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com