विजय मल्ल्याकडून कर्जफेडीसाठी प्रस्ताव

पीटीआय
शनिवार, 10 मार्च 2018

बंगळूर : फरार उद्योगपती विजय मल्ल्या याच्या मालकीच्या युनायटेड ब्रुवरीज होल्डिंग्ज लिमिटेडने (यूबीएचएल) किंगफिशर एअरलाइन्सवरील कर्जाची परतफेड करण्यासाठी देशातील मालमत्तेची विक्री करण्याची तयारी कर्नाटक उच्च न्यायालयासमोर दर्शविली आहे. 

देशात 12 हजार 400 कोटी रुपयांची मालमत्ता असून, यातून किंगफिशर एअरलाइन्सवरील सहा हजार कोटी रपयांचे कर्ज फेडता येईल, असे 'यूबीएचएल'ने न्यायालयाला सांगितले आहे.

मुख्य न्यायाधीश दिनेश माहेश्‍वरी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी 2 एप्रिलपर्यंत तहकूब केली आहे. सध्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सला देण्यात आलेल्या कर्जासाठी 'यूबीएचएल' जामीनदार आहे. 

'यूबीएचएल'ने न्यायालयात सांगितले की, सक्त वसुली संचालनालयाकडून कंपनीची मालमत्ता तसेच, समभाग जप्त करण्यात आले आहेत. यामुळे कंपनी निष्क्रिय बनली आहे. याच कारणामुळे कर्जफेड करण्यासाठी कोणताही प्रस्ताव न्यायालयासमोर याआधी सादर करता आला नव्हता.

किंगफिशरवरील संपूर्ण कर्जाची परतफेड करावयाची झाल्यास याचा आकडा 10 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक होणार नाही. 'यूबीएचएल'च्या मालमत्तेचे बाजारभावानुसार मूल्य सुमारे 12 हजार 400 कोटी रुपये आहे.

Web Title: marathi news Vijay Mallya UBHL Kingfisher Airlines