बाजारातील पतपुरवठा वाढला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

मुंबई - किरकोळ कर्जे, गृहकर्जे आणि वैयक्‍तिक कर्जांची मागणी वाढल्याचे नोव्हेंबर महिन्यात दिसून आले आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालानुसार, नोव्हेंबरअखेरच्या तिमाहीत ७३ हजार ८०० कोटींची कर्जे वितरीत करण्यात आली. ऑक्‍टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये पतपुरठ्यात ३.३ पटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तिमाहीत इतक्‍या मोठ्या प्रमाणात कर्ज वितरणाची ही दशकभरातील पहिलीच वेळ आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने बाजारात सकारात्मक परिणाम झाला आहे. यामुळे ग्राहकांची क्रयशक्‍ती वाढली असून, कर्जांच्या मागणीत वाढ झाल्याचे ‘एसबीआय‘चे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. सौम्य कांती घोष यांनी सांगितले. चालू वर्षात ४.३४ लाख कोटींचा पत पुरवठ्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी नोव्हेंबरअखेरच्या तिमाहीपर्यंत एकूण ३.४६ लाख कोटींचे कर्ज वितरण झाले आहे. सप्टेंबर आणि ऑक्‍टोबर या दोन महिन्यांत कर्ज मागणीवर परिणाम झाला होता. मात्र नोव्हेंबरमध्ये सणासुदीच्या हंगामात कर्ज मागणी वाढल्याचे त्यांनी सांगितले. नोकरदार वर्गाने मोठ्या प्रमाणात पगारतारण कर्ज घेतले आहे. नोव्हेंबरअखेर ७३ हजार ८०० कोटींचे किरकोळ कर्ज वितरण झाले असून त्यात २१ टक्‍क्‍यांची वृद्धी झाली. डिसेंबरमध्येही बहुतांश कर्ज प्रकरणे मंजूर झाल्याची शक्‍यता असून, त्यामुळे वितरणाचा आकडा वाढेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Market Credit Supply Increase Reserve Bank