बाजारात घसरण; आयटी, एफएमसीजी तेजीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

मुंबई: प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील वाढ अल्पकालीन ठरली. सकारात्मक पातळीवर सुरुवात केल्यानंतर पावणे अकराच्या सुमारास सेन्सेक्स 28 अंशांनी कोसळला तर निफ्टीमध्येही किरकोळ घसरण नोंदविण्यात आली.

सध्या(11 वाजून 3 मिनिटे) सेन्सेक्स 21.99 अंशांच्या घसरणीसह 27,266.18 पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 8,407.15 पातळीवर व्यवहार करत असून 5.65 अंशांनी घसरला आहे.

एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रातील तेजीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या तासाभरात शेअर बाजारात सकारात्मक वातावरण होते. सेन्सेक्स 58 अंशांच्या वाढीसह  27,346.19 पातळीवर व्यवहार करत होता. दरम्यान, निफ्टीने 18 अंशांच्या वाढीसह 8430 अंशांची पातळी गाठली होती. बाजारात ऑटो, बँकिंग, मेटल, ऑईल अँड गॅस क्षेत्रात घसरण सुरु आहे.

तिमाही निकालांच्या घोषणेनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. निफ्टीवर एचयुएल, अॅक्सिस बँक, झी एन्टरटेनमेंट, एशियन पेंट्स आणि टेक महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर रिलायन्स इंडस्ट्रीज्, अदानी पोर्ट्स, हिंडाल्को, टाटा स्टील आणि लुपिनचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

Web Title: Market down IT and FMCG high