Budget 2019 : बजेटच्या आधी बाजारातील तेजी विस्तारली 

BSE
BSE

अर्थसंकल्प 2019 : अर्थसंकल्प अपेक्षा : मुंबई : आर्थिक सर्वेक्षण अहवालात विकासदराबाबत वर्तविलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील तेजी गुरुवारी सलग चौथ्या सत्रात कायम राहिली. गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 68 अंशांनी वधारून 39,908 अंशांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 30 अंशांची वाढ होत तो 11,946 अंशांवर बंद झाला. 

चालू आर्थिक वर्षात विकासदर 7 टक्के राहील, असा दावा सरकारने आर्थिक सर्वेक्षणात केला आहे. मोदी 2.0 सरकार शुक्रवारी अर्थसंकल्प सादर करणार असून, यात मागणीला चालना देण्याबरोबर विविध उपाययोजनांसंबंधी होणाऱ्या घोषणांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. याचे पडसाद बाजारावर उमटले. सेन्सेक्‍स मंचावर भारती एअरटेल, टाटा मोटर्स, इंडसइंड बॅंक, कोटक बॅंक, हिरो मोटोकॉर्प, पॉवर ग्रीड आदी शेअर 2.53 टक्‍क्‍यांनी वधारले. तर येस बॅंक, टाटा स्टील, वेदांता, सन फार्मा, एचडीएफसी बॅंक, एनटीपीसीच्या शेअरमध्ये घसरण झाली. 

दरम्यान, जगभरातील प्रमुख भांडवली बाजारांमध्ये आज संमिश्र स्थिती पाहायला मिळाली. इतर केंद्रीय बॅंकांप्रमाणे फेडरल रिझर्व्ह या महिन्यात व्याजदरात कपात करेल, अशी आशा गुंतवणूकदारांना लागली आहे. आशियातील शांघाय, हॉंगकॉंगमधील निर्देशांकात घसरण झाली; तर टोकियो, सोलमधील निर्देशांकासह युरोपातील बहुतांश बाजारात तेजीचे वातावरण होते. 

रुपया वधारला 
चलन बाजारात रुपया डॉलरच्या तुलनेत 39 पैशांनी वधारून 68.50 वर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलदरात झालेल्या घसरणीमुळे रुपयाला बळकटी मिळाली असून, शुक्रवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावरून त्याची पुढील वाटचाल ठरणार असल्याचे विश्‍लेषकांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com