बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्समध्ये 400 अंशांची वाढ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

मुंबई: भारतीय शेअर बाजाराची आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दमदार सुरुवात झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल 400 अंशांनी वधारला असून निफ्टीने सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच 8900 अंशांच्या पातळीवजवळ पोचला होता. एचडीएफसी बँकेतील परदेशी गुंतवणूकदारांसाठी शेअर खरेदीची मर्यादा वाढविण्यात आल्याने बँकेच्या शेअरमध्ये तेजी निर्माण झाली आहे.

सध्या(9 वाजून 35 मिनिटे) सेन्सेक्स 217.90 अंशांच्या वाढीसह 28,519.17 पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 8,832.65 पातळीवर व्यवहार करत असून 54.65 अंशांनी वधारला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे इतर आशियाई बाजारांमध्ये मात्र नकारात्मक वातावरण तयार झाले आहे.

एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये निर्माण झालेल्या तेजीमुळे बँकिंग निर्देशांकांमध्ये तब्बल 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. याशिवाय, कन्झ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑईल अँड गॅस क्षेत्रातदेखील सकारात्मक व्यवहार सुरु आहे. परंतु, ऑटो, कॅपिटल गूड्स, एफएमसीजी, आयटी आणि मेटल क्षेत्रात विक्रीचा दबाव दिसून येत आहे.

निफ्टीवर एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी, अॅक्सिस बँक आणि अरबिंदो फार्माचा शेअर सर्वाधिक तेजीत आहे तर आयडिया सेल्युलर, भारती इन्फ्राटेल, बीएचईएल, इन्फोसिस आणि एचसीएल टेकचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

Web Title: market great start sensex 400 up