मुहूर्त ट्रेडिंग; सेन्सेक्सची 300 अंशांची झेप

वृत्तसंस्था
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

मुंबई: लक्ष्मीपुजनानिमित्त मुहूर्ताच्या ट्रेडिंगवर शेअर बाजारात उत्साह बघायला मिळतो आहे. शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्सने 300 अंशांची झेप घेत 35,302 या इंट्राडे उच्चांकी पातळीला स्पर्श केला. तर 10,616.45 अंशांची पातळी गाठली. सध्या मुंबई शेअर बाजारात आयटी, फायनान्स कंपन्या आणि एनर्जी कंपन्यांचे शेअर सर्वाधिक वधारले आहेत. 

सध्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स  254.21 अंशांनी वधारला असून 35 हजार 246.12  अंशांवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 65.25 अंशांनी वधारला असून तो 10 हजार 595.25 अंशांवर आहे. मुंबई शेअर बाजारात महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस, बीपीसीएल या कंपन्यांचे शेअर सर्वाधिक वधारले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Markets Kick Off Samvat 2075 With Over 300 Point Jump In Sensex