बाजारात विक्रमी घौडदौड; सेन्सेक्स तीस हजारांच्या पार

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

मुंबई: भारतीय शेअर बाजारातील विक्रमी घौडदौड कायम असून सेन्सेक्सने आज(बुधवार) अखेर 30,000 अंशांची पातळी करीत नवा उच्चांक गाठला. आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक घडामोडींमुळे निफ्टीनेदेखील 9,350 अंशांची महत्त्वपूर्ण पातळी पार केली आहे. जागतिक घडामोडी आणि कंपन्यांच्या मजबूत तिमाही निकालांमुळे रुपयाचे मूल्यदेखील मजबूत झाले आहे.

सध्या(10 वाजून 20 मिनिटे) सेन्सेक्स 149.82 अंशांच्या वाढीसह 30,093.06 पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 9,350.75 पातळीवर व्यवहार करत आहे. बाजारात मेटल क्षेत्रात एक टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. याशिवाय, एफएमसीजी आणि बँकिंग क्षेत्रात विशेष तेजीचे वातावरण आहे. याऊलट, आयटी, हेल्थकेअर, ऑईल अँड गॅस क्षेत्रात विक्रीचा किरकोळ दबाव दिसून येत आहे.

निफ्टीवर हिंडाल्को, विप्रो, गेल, टाटा स्टील आणि कोटक महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर भारती इन्फ्राटेल, सिप्ला, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि पॉवरग्रिड कॉर्पोरेशनचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

 रुपया उच्चांकी पातळीवर

भारतीय रुपयाने आज 20 महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 63.93 रुपये प्रतिडॉलरएवढे झाले आहे. आशियाई बाजारातील तेजीमुळेदेखील रुपयाला बळ मिळाले आहे.

Web Title: Markets live: Sensex, Nifty hit all time highs