मारुतीच्या मासिक विक्रीत 15 टक्के वाढ

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 जून 2017

ब्रेझा, ऑल्टो आणि वॅगनआरला मागणी कायम 

 नवी दिल्ली: देशातील प्रमुख वाहन कंपनी मारुती सुझुकीने मे महिन्यात देशात एकुण 1 लाख 30 हजार 248 वाहनांची विक्री केली आहे. ऑल्टो, बलेनो आणि वॅगनआरसारख्या 'बेस्ट-सेलिंग' मोटारी आणि वितारा ब्रेझा आणि इर्टिगा या युटिलिटी मोटारींना मागणी वाढल्याने कंपनीने चांगली कामगिरी नोंदवली.

ब्रेझा, ऑल्टो आणि वॅगनआरला मागणी कायम 

 नवी दिल्ली: देशातील प्रमुख वाहन कंपनी मारुती सुझुकीने मे महिन्यात देशात एकुण 1 लाख 30 हजार 248 वाहनांची विक्री केली आहे. ऑल्टो, बलेनो आणि वॅगनआरसारख्या 'बेस्ट-सेलिंग' मोटारी आणि वितारा ब्रेझा आणि इर्टिगा या युटिलिटी मोटारींना मागणी वाढल्याने कंपनीने चांगली कामगिरी नोंदवली.

परंतु, कंपनीच्या निर्यातीत मात्र 36 टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीच्या एकुण विक्रीत 11.3 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीने मेमध्ये एकुण 1 लाख 36 हजार 962 वाहनांची विक्री केली. बाजारपेठेत 47 टक्के हिस्सेदारीवर वर्चस्व असणाऱ्या मारुतीच्या देशांतर्गत मासिक विक्रीत 15 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्यावर्षी याच महिन्यात कंपनीने देशात 1 लाख 13 हजार 162 वाहनांची विक्री केली होती. गेल्या महिन्यात, कंपनीने परदेशात 6,286 मोटारींची निर्यात केली आहे. विक्रीसंबंधी आकडेवारी जाहीर झाल्यानंतर कंपनीच्या शेअरने 7249.30 रुपयांवर 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे.

मारुतीच्या युटिलिटी वाहनांच्या विक्रीचे प्रमाण 66 टक्क्यांनी वधारुन 22 हजार 608 युनिट्स झाले. त्याचप्रमाणे, मिनी श्रेणीतील मोटारींच्या विक्रीचे प्रमाण 18 टक्क्यांनी वधारुन 39 हजार 089 झाले आहे. याशिवाय, बलेनो आणि डिझायरसारख्या कॉम्प्टॅक्ट सेगमेंटमधील वाहनांची विक्री 10 टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीने मे महिन्यात 51,324 कॉम्प्टॅक्ट श्रेणीतील मोटारींची विक्री केली आहे.

मुंबई शेअर बाजारात मारुती सुझुकीचा शेअर सध्या(12 वाजून 20 मिनिटे) 7156.45 रुपयांवर व्यवहार करत असून 0.81 टक्क्याने घसरला आहे. पाच रुपये दर्शनी मूल्य असणाऱ्या शेअरने वर्षभरात  3868.10 रुपयांची नीचांकी तर   7249.30 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या भावानुसार कंपनीचे 216,153.39 कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.

Web Title: Maruti's monthly sales increased 15 percent