मेहुल चोक्सीला भारतात पाठवणार नाही: अँटिग्वा सरकार

 मेहुल चोक्सीला भारतात पाठवणार नाही: अँटिग्वा सरकार

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) कर्ज बुडवून फरार झालेला मेहुल चोक्सीला भारताकडे सोपविण्यास अँटिग्वा सरकारने नकार दिला आहे. शनिवारी काही माध्यमांतील वृत्तांतून हा दावा करण्यात आला होता की, मेहुल चोक्सी आणि जतीन मेहता यांना भारतात आणण्यासाठी भारताकडून बोईंग विमान पाठवण्यात आले आहे. माध्यमांतील वृत्तांतून देण्यात येणाऱ्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर अँटिग्वा सरकारने चोक्सीला भारतात पाठवणार नसल्याचे  स्पष्टीकरण दिले आहे.

मेहुल चोक्सीने अँटिग्वा देशाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. अँटिग्वा आणि किट्स देशांमध्ये मेहुल चोक्सी आणि जतीन मेहता अनुक्रमे हे दोघेही शरण गेले आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, कॅरेबिअन बेटांवर सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अधिकारी जाणार होते. भारताचे हे अधिकारी त्यासाठी एक बोईंग विमान घेऊन जाणार होते. मात्र, अँटिग्वाच्या पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी लियोनेल हर्स्ट यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना सांगितले की, आता चोक्सी अँटिग्वाचा नागरिक आहे आणि येथील सरकार त्याची नागरिकता हिसकावून घेऊ शकत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com