(Videos): 'मर्सिडीझ'चे चॅलेंज तुम्ही स्वीकारणार का?

Mercedes-Benz completes 25 years of production in India
Mercedes-Benz completes 25 years of production in India

पुणे: जगप्रसिद्ध लक्झरी कार आणि वाहन उद्योगातील आघाडीची कंपनी असलेल्या मर्सिडीझ बेंझने विक्रीनंतरच्या ग्राहकांसाठीच्या आपल्या काही खास योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये ऑनलाईन सर्व्हिस एस्टीमेट, बुकिंग सेवा, प्रिमियर एक्सप्रेस सर्व्हिस ज्यानुसार फक्त तीन तासात कारची सर्व्हिसिंग करून ती ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि तीन तासात सर्व्हिस सेंटर ही सेवा पूर्ण करू शकले नाही तर ग्राहकांकडून सेवाशुल्क घेतले जाणार नाही. या आणि अशा अनेक नाविन्यपूर्ण आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेतलेल्या सेवांची घोषणा मर्सिडीझ बेंझने केली आहे.

मर्सिडीझच्या चाकण उत्पादन प्रकल्पाबाबत माहिती देत आहेत गौरव मुठे 

मर्सिडीझ बेंझ आपल्या लक्झरी कारबरोबरच आपल्या ग्राहकांना पुरवत असलेल्या सुविधांसाठीही ओळखली जाते. भारतातील उत्पादनाला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने विक्रीनंतर ग्राहकांना पुरवण्यासाठी काही खास वैशिष्टपूर्ण आणि नाविन्यपूर्ण सुविधांची घोषणा केली आहे, सकाळशी बातचीत करताना कंपनीच्या कस्टमर सर्व्हिसेस आणि कॉर्पोरेट अफेअर्स विभागाचे उपाध्यक्ष शेखर भिडे यांनी अनेक मुद्दयांवर चर्चा केली. शेखर भिडे दोन दशकांहून अधिक काळ मर्सिडीझ बेंझमध्ये कार्यरत आहेत. मर्सिडीझ बेंझने सध्या आणलेल्या विविध सुविधा, कंपनीची मागील 25 वर्षातील वाटचाल, वाहन उत्पादन क्षेत्र, ईलेक्ट्रिक वाहने, मर्सिडिज बेन्झच्या आगामी योजना, आंतरराष्ट्रीय आणि देशातंर्गत अर्थव्यवस्थेतील चढउतारांमुळे निर्माण झालेली आव्हाने अशा अनेक मुद्दयांवर शेखर भिडे यांनी दिलखुलासपणे आपली मते मांडली.

विजय तावडे यांनी मर्सिडीझचे कस्टमर सर्व्हिसेस आणि कॉर्पोरेट अफेअर्स विभागाचे उपाध्यक्ष शेखर भिडे यांच्याशी संवाद साधला.

मर्सिडिज बेन्झला भारतात 25 वर्षे पूर्ण 

मर्सिडिज बेन्झच्या कारचे भारतातच उत्पादन करण्याला 25 वर्षे पूर्ण झाली आहे. 1994 मध्ये मर्सिडिज बेन्झने भारतातील आपली पहिली असेंब्ली लाईन सुरू केली होती. त्यावेळेच्या टेल्को आणि आताच्या टाटा मोटर्सच्या उत्पादन प्रकल्पातच हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. त्यानंतर 2009 मध्ये मर्सिडिज बेन्झने भारतातील आपल्या नव्या 100 एकरांपेक्षा जास्त जागेवर पसरलेल्या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाची पुण्याजवळच्या चाकण येथे सुरूवात केली होती. सध्या या उत्पादन प्रकल्पाता मर्सिडिजच्या सी क्लास, इ क्लास आणि एस क्लास मायबॅक एस क्लास, जीएलए, जीएलसी, जीएलई आणि जीएलएस या एसयुव्हींची निर्मिती केली जाते अशा विविध मॉडेलची निर्मिती केली जाते.

चाकण येथील उत्पादन प्रकल्प सुरू झाल्यानंतर मर्सिडीझ बेंझने भारतात अनेक मैलाचे दगड गाठले आहेत. चाकण येथील उत्पादन प्रकल्पाचा कंपनीच्या जागतिक उत्पादन नेटवर्कमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. मर्सिडीझ बेंझचे भारतातील 47 शहरांमध्ये एकूण 95 आऊटलेट आहेत. जानेवारी ते सप्टेंबर 2019 या कालावधीत 9,915 कारची विक्री करून भारतातील लक्झरी कारच्या बाजारपेठेत मर्सिडीझ बेंझने आघाडी घेतल्याची  माहिती कंपनीकडून देण्यात आली. भविष्यातील गरजा आणि होणारे बदल लक्षात घेऊन चाकण येथील उत्पादन प्रकल्पात कंपनी अत्याधुनिक आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करते आहे. ईलेक्ट्रिक वाहनांना बाजारात आणण्यासंदर्भातही मर्सिडीझ बेंझने योजना आखल्या आहेत.

मर्सिडीझ बेंझचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन शेवेंक म्हणाले, ‘भारतात 25 वर्षपूर्तीबद्दल मी ग्राहकांचे आभार मानतो. ग्राहकांनी मर्सिडीझ- बेंझ या ब्रँडला दिलेला पाठिंबा, निष्ठा आणि विश्वास आमच्यासाठी मौल्यवान आहेत. ग्राहकांचे म्हणणे आम्ही कायम ऐकून घेतो आणि आमच्या मते ते सर्वोत्तम शिक्षक असतात. हे वैशिष्ट्यपूर्ण विक्रीपश्चात उपक्रम ग्राहकांच्या गरजा विशेषतः दैनंदिन आयुष्यातली त्यांची व्यग्रता लक्षात घेऊन बनवण्यात आले आहेत. हे उपक्रम थ्री- पॉइंटेड स्टारचे मालक असण्याचा अनुभव आणखी उंचावतील व मर्सिडीझ बेंझ ब्रँड व ग्राहकांचे नाते दृढ करतील. ग्राहकांना या उपक्रमांचा चांगला फायदा होईल असा आम्हाला विश्वास वाटतो.’

भारतातील कामकाजाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मर्सिडिज बेन्झने 25 विक्रीपश्चात उपक्रमांची घोषणा केली आहे.
या उपक्रमांची माहिती पुढीलप्रमाणे -
प्रीमियर एक्सप्रेस प्राइम – आता ग्राहकांना त्यांच्या कारचे सर्व्हिसिंग होऊन ती केवळ तीन तासांत तयार होईपर्यंत निवांत आराम करत येणार आहे. तसे न झाल्यास, ही सेवा मोफत आहे असे समजा. डिसेंबर 2019 मध्ये सुरू होणार असलेली ही सेवा बंगळुरू येथे लाँच झाल्यानंतर दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि हैद्राबाद अशा वेगवेगळ्या शहरांत प्रवास करणार आहे.

फास्ट लेन बॉडी आणि पेंट – ही सेवा ग्राहकांना त्यांच्या गाडीचे अपघातात झालेले किरकोळ नुकसान कामाच्या केवळ 25 तासांच दुरुस्त करून देणार आहे. सध्या ही योजना अहमदाबाद, मुंबई आणि पुणे या शहरांतच मिळणार असून डिसेंबर 2019 पासून तिची सुरुवात होईल.

मर्सिडीझ- बेंझ कार केयर किट्स – मर्सिडीझ- बेंझ ब्रँडेड कार केयर किट्स डिसेंबर 2019 या एका महिन्याभरासाठी 25 टक्के सवलतीत उपलब्ध केले जाणार आहेत. हे किट्स गेल्या काही काळात ग्राहकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाले आहेत.

ऑनलाइन सर्व्हिस एस्टीमेट आणि ऑनलाइन सर्व्हिस अपॉइटमेंट आरक्षण – मर्सिडीझ- बेंझद्वारे ग्राहकांना आता सर्व्हिसच्या खर्चाचा अंदाज ऑनलाइन दिला जाणार आहे. त्याशिवाय डिसेंबर 2019 या महिन्यात जे ग्राहक पहिली ऑनलाइन अपॉइंटमेंट आरक्षित करतील त्यांना 25 टक्के सवलत दिली जाणार आहे.

मर्सिडीझ- बेंझ एएमजी तेल – केवळ काही महिन्यांपूर्वीच लाँच करण्यात आलेली मर्सिडीझ- बेंझची उच्च कामगिरी करणारी एएमजी तेल उत्पादने डिसेंबर 2019 या पूर्ण महिन्याभरात कार सर्व्हिसिंगदरम्यान 25 टक्के सवलतीत उपलब्ध केली जातील.

एएमजीसाठी मर्सिडीझ- बेंझ प्रमाणित टायर्स – एएमजी गाड्यांसाठी मर्सिडीझ प्रमाणित टायर्सची श्रेणी ग्राहकांना 15 डिसेंबर 2019 ते या महिन्याअखेरपर्यंत गाडीच्या सर्व्हिसिंगदरम्यान 25 टक्के सवलतीत उपलब्ध केल जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com