Tech Layoff : मार्क झुकरबर्गचा कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! पुन्हा एकदा करणार कर्मचारी कपात; कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mark zuckerberg

Tech Layoff : मार्क झुकरबर्गचा कर्मचाऱ्यांना मोठा धक्का! पुन्हा एकदा करणार कर्मचारी कपात; कारण...

Meta Layoffs 2023 : जगभरातील मंदीच्या शक्यतेमुळे (Layoffs 2023), अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. त्यात फेसबुकची मूळ कंपनी मेटाच्या नावाचाही समावेश आहे.

आता मेटाबाबत आणखी एक मोठी बातमी येत आहे. कंपनी आगामी काळात आणखी काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू शकते.

फायनान्शिअल टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या वर्षी फेसबुकची मूळ मेटा प्लॅटफॉर्म्सने बजेट जारी केलेले नाही. यामागचे कारण म्हणजे कंपनी आता पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची छाटणी करण्याचा विचार करत आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बजेट न मिळाल्याने आणि कंपनीच्या भीतीमुळे मेटा कर्मचाऱ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे.

मेटाने यापूर्वीही केली होती कर्मचारी कपात :

याआधीही मेटाने 2022 मध्ये नोव्हेंबर महिन्यात सुमारे 11,000 कामगारांना कामावरून काढून टाकले होते. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या हे प्रमाण 13 टक्के होते. मेटा ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्स अॅप सारख्या कंपन्यांची मूळ कंपनी आहे.

यापूर्वी कंपनीचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग म्हणाले होते की, हे वर्ष आमच्या कंपनीसाठी खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत 2023 मध्ये आपल्याला समजून घेऊन पुढे जावे लागेल. मेटा नुसार, कंपनीचा यावर्षीचा खर्च 89 ते 89 अब्ज डॉलर्स दरम्यान असेल.

याहूनेही 1600 लोकांना कामावरून काढून टाकले :

मोठी टेक कंपनी याहूनेही आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनीने 1600 लोकांना कामावरून काढले आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या हे प्रमाण 20 टक्के आहे. यापूर्वी, डिस्नी या मोठ्या मनोरंजन कंपनीनेही आपल्या 7,000 कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. कंपनीला होत असलेल्या तोट्यामुळे कंपनीचे सीईओ बॉब इगर यांनी हा निर्णय घेतला.