धातू कंपन्यांच्या समभागांना झळाळी

पीटीआय
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मुंबई -  धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागातील तेजीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स गुरुवारी ९५ अंशांनी वधारून ३४ हजार ४२७ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३९ अंशांनी वाढून १० हजार ५६५ अंशांवर बंद झाला. 

‘टीसीएस’सह अन्य कंपन्यांचे तिमाही निकाल सकारात्मक लागण्याच्या आशेने शेअर बाजारात गुरुवारी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सेन्सेक्‍स सकाळी ३४ हजार ४७८ अंशांवर पोचला. त्यानंतर सुरू झालेल्या नफेखोरीमुळे तो ३४ हजार ३५८ अंशांवर घसरला. अखेर तो कालच्या तुलनेत ९५ अंशांनी वाढून ३४ हजार ४२७ अंशांवर बंद झाला. काल निर्देशांकात ६३ अंशांची घसरण झाली होती. 

जागतिक पातळीवर कमोडिटीचे भाव वाढल्याने धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात आज ४ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक वाढ झाली. नाल्को, हिंदाल्को, वेदांता, सेल, जेएसडब्लू स्टील, जिंदाल स्टील, हिंदुस्थान झिंक, टाटा स्टील आणि एनएमडीसी यांच्या समभागात ९ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ नोंदविण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव वधारल्याने डॉलरच्या तुलनेत रुपया सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला. यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागातही चांगली वाढ नोंदविण्यात आली. 

निर्देशांकातील वाढ 
 सेन्सेक्‍स - ९५ अंश 
 निफ्टी - ३९ अंश

Web Title: Metal stocks shine