Video : एमजी मोटरनं लाँच केली, पहिली इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही 

mg motors india launches first electric internet suv car
mg motors india launches first electric internet suv car

नवी दिल्ली : एमजी (मॉरिस गॅरेज) मोटर इंडियाने 'झेडएस ईव्ही' या आपल्या संपूर्ण इलेक्ट्रिक वेहिकल ईकोसिस्टम अनावरण केले आहे. ही देशातील पहिली इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही आहे. या लॉन्चद्वारे एमजी मोटर इंडियाने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेनं  महत्त्वाचं पाऊल टाकलंय. 

इलेक्ट्रिक व्हेइकल असले तर, पावसात गाडीचं काय? चार्जिंग कुठं करणार? किती वेळात चार्ज होणार? गाडीच्या स्पीडचं काय? अशा उपस्थित होणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एमजी मोटर्सनं या कार लाँचमध्ये दिली आहेत. भारतातली पहिली संपूर्ण इलेस्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही असल्यामुळं 'झेडएस ईव्ही' लक्षवेधी ठरत आहे. स्नो व्हाईट, रेड आणि सिल्वर या रंगांमध्ये ही कार उपलब्ध असणार आहे. इलेक्ट्रिक कार विषयी ग्राहकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्यात पहिली शंका, किती किलोमीटर धावणार ही असते. एमजी मोटर्सच्या दाव्यानुसार 'झेडएस ईव्ही' पूर्ण चार्जिंग झाल्यानंतर 340 किलोमीटर धावू शकते. दुसरी मोठी शंका, चार्चिंग कोठे करायचं? ही असते. एमजी मोटर्सने अनेक ठिकाणी मल्टी-स्टेप चार्जिंग ईकोसिस्टमच्या उभारणीसाठी कंपन्यांशी भागीदारी केली आहे. त्यामुळं चार्जिंगची भीती दूर होणार आहे. 

काय आहेत 'झेडएस ईव्ही'ची वैशिष्ट्य?

  • केवळ ८.५ सेकंदात ताशी १०० किमी वेगाने धावू शकते
  • एसी फास्ट चार्जरद्वारे घरी किंवा ऑफिस पार्किंगमध्ये चार्जिंग शक्य
  • एमजी शोरूम्सवर 24 तास चार्जिंग सुविधा उपलब्ध होणार
  • ५० मिनिटात ८०% बॅटरी चार्ज होऊ शकते 
  • घरी किंवा ऑफिसमध्ये पूर्ण चार्जिंगसाठी सहा ते आठ तास लागू शकतात 
  • बॅटरी किती चार्ज झाली हे पाहण्याची स्मार्टफोनवर सुविधा
  • प्रत्येक झेडएस ईव्ही सोबत एक ऑन-बोर्ड केबल असणार 
  • केबलच्या साह्याने कोठेही केव्हाही चार्चिंग करणं शक्य 
  • चार्जिंग पॉइंट किती अंतरावर आहे, हे स्मार्टफोनमध्ये दिसणार
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com