Milk Price Hiked : महागाईचा भडका! दुधाच्या दरात पुन्हा वाढ; असे आहेत नवे दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

milk

Milk Price Hiked : महागाईचा भडका! दुधाच्या दरात पुन्हा वाढ; असे आहेत नवे दर

Milk Price Hiked : सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा नाहीच. आता दुधाच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ केली असून फुल क्रीम दूध आता ६३ रुपयांऐवजी ६४ रुपये प्रतिलिटरने मिळणार आहे. म्हणजेच प्रतिलिटर दुधाच्या दरात एक रुपयाची वाढ झाली आहे.

हेही वाचा : सावरकरांविषयी प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात आणि बरंच काही!

याशिवाय मदर डेअरीने टोकनयुक्त दुधाच्या दरातही दोन रुपयांनी वाढ केली आहे. मदर डेअरीने टोकन दुधाच्या दरात प्रतिलिटर ४८ रुपयांवरून ५० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. म्हणजेच आता रोजचा दूध आणि चहाही महागणार आहे.

मात्र, पूर्ण क्रीम दुधाच्या अर्धा लिटर (५०० एमएल) पॅकेटच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. म्हणजेच, जर तुम्ही प्रत्येकी १ लिटरसाठी ५०० मिलीचे २ पॅक विकत घेतले तर तुम्हाला मदर डेअरीचे फुल क्रीम दूध पूर्वीप्रमाणेच मिळेल.

हेही वाचा: Credit Card : क्रेडिट कार्ड चोरी किंवा हरवल्यास होऊ शकते लोखोंचे नुकसान; लगेच करा 'या' गोष्टी

अलीकडेच मदर डेअरी आणि अमूलने ऑक्टोबर महिन्यातही दुधाच्या दरात वाढ केली होती. अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे २-२ रुपयांनी वाढ केली होती.