तेलाच्या भावात घसरण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

लंडन - ‘ओपेक’ आणि सहकारी देशांनी खनिज तेलाचे उत्पादन दररोज दहा लाख बॅरलने वाढविण्याचा निर्णय घेतल्याने खनिज तेलाच्या भावात सोमवारी एक टक्‍क्‍याहून अधिक घसरण झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा भाव आज प्रतिबॅरल १.१७ डॉलरने घसरून ७४.३९ डॉलरवर आला. मागील आठवड्यात तेल उत्पादक देशांची संघटना ‘ओपेक’ने तेल उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पुरवठ्यात फार मोठी वाढ न झाल्याने सुरवातीला खनिज तेलाचे भाव वाढले होते. आता भावात घसरण सुरू झाली आहे.  ‘ओपेक’ आणि सहकारी देशांनी खनिज तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेतला होता.

लंडन - ‘ओपेक’ आणि सहकारी देशांनी खनिज तेलाचे उत्पादन दररोज दहा लाख बॅरलने वाढविण्याचा निर्णय घेतल्याने खनिज तेलाच्या भावात सोमवारी एक टक्‍क्‍याहून अधिक घसरण झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचा भाव आज प्रतिबॅरल १.१७ डॉलरने घसरून ७४.३९ डॉलरवर आला. मागील आठवड्यात तेल उत्पादक देशांची संघटना ‘ओपेक’ने तेल उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पुरवठ्यात फार मोठी वाढ न झाल्याने सुरवातीला खनिज तेलाचे भाव वाढले होते. आता भावात घसरण सुरू झाली आहे.  ‘ओपेक’ आणि सहकारी देशांनी खनिज तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेतला होता. दरम्यान खनिज तेलाची जागतिक पातळीवरील मागणी आणि पुरवठा यातील तफावत अधिक आहे. यामुळे पुरवठ्यात वाढ होऊनही यावर्षी तेलाचे भाव चढेच राहतील, असा विश्‍लेषकांचा अंदाज आहे.

Web Title: Mineral oil rate decrease