खनिज तेलाचा भाव गडगडला 

पीटीआय
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

मुंबई - जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात घसरण होऊन तो बुधवारी प्रतिबॅरल ६५.१७ डॉलरवर आला. खनिज तेलाच्या भावात आज ७ टक्के घसरण झाली. 

मुंबई - जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात घसरण होऊन तो बुधवारी प्रतिबॅरल ६५.१७ डॉलरवर आला. खनिज तेलाच्या भावात आज ७ टक्के घसरण झाली. 

तेल उत्पादक देशांची संघटना ‘ओपेक’ने तेलाचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी उत्पादनात कपात करण्याचे धोरण कायम ठेवावे, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. याचबरोबर त्यांनी सौदी अरेबियाच्या तेल उत्पादनात कपात करण्याच्या निर्णयावरही टीका केली. अमेरिकेने तेल उत्पादनही वाढविले आहे. या पार्श्‍वभूमीवर खनिज तेलाच्या भावात घसरण नोंदविण्यात आली. मागील १२ पैकी ११ सत्रांमध्ये तेलाच्या भावात घसरण नोंदविण्यात आली आहे. या कालावधीत तेलाच्या भावात ३० टक्के घसरण झाली आहे. जागतिक पातळीवर पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत खनिज तेलाचा पुरवठा अधिक राहण्याची शक्‍यता आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनाला ‘ओपेक’चा प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता कमी असल्याचा अंदाज विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. याआधी जून महिन्यात ट्रम्प यांनी केलेल्या कपातीच्या आवाहनाला ‘ओपेक’मधील सदस्य देशांनी प्रतिसाद देत उत्पादनात कपात केली होती. 

खनिज तेलाचा भाव 
प्रतिबॅरल - ६५.१७ डॉलर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mineral Oil rate Decrease