काही मिनिटात 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मुंबई: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) नुकतेच तिमाही आर्थिक निकाल सादर केले. कंपनीने सरलेल्या तिमाहीत 6,904  कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. परिणामी आज इंट्राडे व्यवहारात कंपनीच्या शेअरने 3399.90 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. ही शेअरची वर्षभरातील उच्चांकी पातळी आहे. शेअरने उच्चांकी पातळी गाठल्याने काही मिनिटांमध्ये गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. कंपनीचे बाजारभांडवल 30 हजार कोटींनी वाढले आहे. 

कंपनीच्या संचालक मंडळाने बोनस शेअर देण्याची घोषणा केली असून एकास एक बोनस शेअर जाहीर करण्यात आला आहे. शिवाय प्रतिशेअर 29 रुपयांचा लाभांश देखील जाहीर करण्यात आला आहे. 

सध्या मुंबई शेअर बाजारात टीसीएसचा शेअर 6.22 टक्क्यांनी म्हणजेच 198.35 रुपयांनी वधारला असून तो 3389 रुपयांवर व्यवहार करतो आहे. सध्याच्या शेअर्सच्या बाजारभावानुसार कंपनीचे बाजारभांडवल 647,804.49 कोटी रुपयांवर पोचले आहे. 

Web Title: In Minutes, TCS Makes Investors Richer By Rs. 30,000 Cr.