दिशाभूल करून मिस्त्री बनले अध्यक्ष

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

टाटा सन्सचा आरोप; समूहाची व्यवस्थापन रचना कमकुवत केल्याची टीका

नवी दिल्ली: देशातील आघाडीच्या टाटा उद्योगसमूहातील वाद शमण्याची चिन्हे नसून रविवारी टाटा सन्सने सायरस मिस्त्री यांच्यावर आरोप केले. मिस्त्री यांनी समूहाची दिशाभूल करून अध्यक्षपद मिळविले आणि नंतर आधी दिलेला शब्द न पाळता व्यवस्थापन रचना कमकुवत केली, असा आरोप टाटा सन्सने केला.

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आल्यापासून मिस्त्री आणि टाटा यांच्यात वाद सुरू आहे. मिस्त्री यांना महत्त्वाच्या कंपन्यांच्या संचालक मंडळावरून हटवण्यासाठी भागधारकांची विशेष बैठक बोलाविण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर टाटा सन्सने म्हटले आहे, की रतन टाटा यांच्या जागी अध्यक्षपदी निवड करण्यासाठी नेमलेल्या समितीची मिस्त्री यांनी दिशाभूल केली. टाटा समूहाबद्दल त्यांनी अवाजवी योजना मांडल्या. मात्र, चार वर्षांच्या कालावधीत त्यांनी यातील कोणतीही योजना तडीस नेली नाही. त्यामुळे आमच्या मते त्यांनी निवड समितीची दिशाभूल केली आहे.

मिस्त्री यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या शापूरजी पालनजी समूहापासून अंतर राखले नाही. त्यांचे हे वर्तन अयोग्य होते. संस्था प्रशासन तत्त्वांचा भंग त्यांनी केला आहे. आधी निवड समितीला दिलेला शब्द न पाळल्यामुळे टाटासमूहाचे नेतृत्व त्यांनी करण्याबाबत गंभीर चिंता निर्माण झाली. त्यांना दिलेल्या संपूर्ण अधिकारांचा वापर त्यांनी व्यवस्थापन रचना कमकुवत करण्यासाठी केला, असा आरोपही टाटा सन्सने केला आहे.

Web Title: Mistry became president by misleading