मॉर्डन फुडची मुंबई-ठाण्यात विस्तार योजना 

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जून 2017

मुंबई : आघाडीची ब्रेड उत्पादक मॉर्डन फुड एंटरप्राइजेसने मुंबई-ठाण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. कंपनीने ब्रेडचे विविध ब्रॅंड विकसित केले असून त्यानुसार स्थानिक बाजारातील वितरण व्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

मुंबई आणि उपनगरातील वितरण 50 टक्‍क्‍यांनी आणि महसुलात 25 टक्‍क्‍यांची वाढ करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मॉर्डन फुडचे मुख्य कार्यकारी असीम सोनी यांनी सांगितले. नवे वितरक नेमण्याबरोबरच उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच पराठा आणि रोटी यासारख्या रेडी टू इट श्रेणीत उतरणार असल्याचे संकेत त्यांनी या वेळी दिले. 

Web Title: Modern Food Expansion Scheme in Mumbai-Thane