File photo of Nirmala Sitaraman
File photo of Nirmala Sitaraman

बजेट 2019 : चार वर्षांत प्रत्येकाला मिळणार घर, पाणी आणि गॅस! 

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : दणदणीत विजयासह सलग दुसऱ्यांदा सत्तेत दाखल झालेल्या भाजप सरकारने समाजातील विविध स्तरांसाठी भरघोस योजना जाहीर केल्या आहेत. निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या पूर्ण अर्थसंकल्पामध्ये देशातील प्रत्येकाला घर देण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली. 

पुढील चार वर्षांमध्ये 1.95 कोटी नागरिकांना पक्की घरे उपलब्ध करून दिली जातील, असे सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये जाहीर केले. 'प्रत्येक गावामध्ये आता एलपीजी कनेक़्शन मिळाले आहे', असेही सरकारने सांगितले. उज्ज्वला आणि सौभाग्य योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात आमूलाग्र बदल झाल्याचे निरीक्षण सीतारामन यांनी नोंदविले. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सात कोटी नागरिकांना गॅस कनेक़्शन मिळाले आहे. 

अर्थसंकल्पाच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सीतारामन काय म्हणाल्या? 

  • 2022 पर्यंत 1.95 कोटी नागरिकांना घरे देणार
  • पारंपारिक उद्योगांना तंत्रज्ञानाची जोड देण्यात येईल
  • कृषी उद्योगासह दूध व्यवसायाला चालना देण्यात येईल
  • डाळींच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण होण्यासाठी देशाचा प्रयत्न
  • दूध उप्तापदांच्या विक्रीसाठी नव्या योजना आणणार
  • अन्नदात्याला उर्जादाता बनविण्यावर भर देण्यात येईल
  • पिण्याच्या पाण्याच्या योग्य नियोजनासाठी मंत्रालयाची स्थापना 
  • प्रत्येक घरात पाणी ही राज्य सरकारच्या माध्यामातून योजना
  • जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरात योजना राबविणार (रेनवॉटर हार्वेस्टिंग)
  • हर घर नल, हर घर जल ही योजना राबविणार
  • ग्रामीण क्षेत्र हा भारताचा आत्मा आहे
  • उज्ज्वला आणि सौभाग्य योजना या ग्रामीण भागासाठी आम्ही आणल्या
  • उज्ज्वला योजनेतून सात कोटी नागरिकांना गॅस कनेक्शन दिले आहेत
  • गावातील प्रत्येक घरात एलपीजी कनेक्शन मिळाले आहे
  • प्रत्येकाला घर देण्याची सरकारची योजना आहे
  • प्रत्येक घरात गॅस कनेक्शन, वीज सुविधा असेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com