रिझव्‍‌र्ह बॅंकेचे द्विमाही पतधोरण 5 ऑक्टोबर रोजी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

मुंबई: रिझव्‍‌र्ह बँकेचा द्विमाही पतधोरण आढावा येत्या 5 ऑक्टोबर रोजी घेतला जाणार आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीकडे तमाम अर्थतज्ज्ञ, उद्योग तसेच बँक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. इंधनाचे वाढते दर आणि यंदा वाढत्या महागाईमुळे व्याजदर वाढीची अटकळ बांधली जात आहे. 

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय पतधोरण समितीची बैठक येत्या महिन्यात 5 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.

महागाईचा दर अद्यापही रिझव्‍‌र्ह बँकेच्या समाधानकारक अशा 4 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने तसेच हमीभावातील वाढ, सातवा वेतन आयोग आदींमुळे भविष्यातील महागाईवर दबाव राहणार असल्याच्या शक्यतेने रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदरात वाढ केली जायची शक्यता आहे. व्याजदर जैसे थे किंवा पाव टक्के दरवाढ असा पर्याय निवडला जाण्याची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

सध्याचे दर 
रेपो रेट : 6.50 टक्के 
रिझर्व्ह रेपो रेट: 6.25 टक्के 
बँक रेट: 6.75 टक्के

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monetary Policy Committee will meet on 5th Oct