अर्थव्यवस्थेची वाट बिकटच...

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

"मूडीज'ने घटवला भारताचा विकासदराचा अंदाज 
नवी दिल्ली, ता. 14(पीटीआय) : अमेरिकी पतमानांकन संस्था "मूडीज'ने चालू आर्थिक वर्षासाठीचा भारताच्या एकूण देशांर्तगत उत्पन्नाचा (जीडीपी) अंदाज घटविला आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 5.6 टक्के राहील, असा अंदाज "मूडीज'ने वर्तवला होता. याआधी "मूडीज'ने विकासदर 5.8 टक्के राहील, असा अंदाज वर्तविला होता. 

"मूडीज'ने घटवला भारताचा विकासदराचा अंदाज 
नवी दिल्ली, ता. 14(पीटीआय) : अमेरिकी पतमानांकन संस्था "मूडीज'ने चालू आर्थिक वर्षासाठीचा भारताच्या एकूण देशांर्तगत उत्पन्नाचा (जीडीपी) अंदाज घटविला आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 5.6 टक्के राहील, असा अंदाज "मूडीज'ने वर्तवला होता. याआधी "मूडीज'ने विकासदर 5.8 टक्के राहील, असा अंदाज वर्तविला होता. 

पहिल्या तिमाहीमध्ये विकासदरात झालेली घसरण, वाढती कर्जे आणि वित्तीय तूट कमी करण्यात अपयश आल्याने "मूडीज'ने नुकतेच भारताचे पतमानांकन स्थिरवरून नकारात्मक केले आहे. तसेच, भारताचा विकासदराचा वेग आणखी कमी राहण्याची शक्‍यता व्यक्त केली होती. "मूडीज'ने भारताचे परकी चलनामधील मानांकन देखील "Baa2' केले आहे. हे मानांकन कमी गुंतवणूक श्रेणीतील मानले जाते. चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत विकासदर 5 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला आहे. देशांतर्गत मागणी आणि विक्री कमी झाल्याने विकासाला झळ बसली आहे. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट एकूण देशांर्तगत उत्पन्नाच्या (जीडीपी) 3.7 टक्‍क्‍यांपर्यंत वाढेल, असा अंदाजही "मूडीज'ने व्यक्त केला होता. आर्थिक स्थिती पूर्वपदावर आली नाही तर मानांकन वृद्धी अशक्‍य आहे. तसेच, कंपनी करातील कपातीने सरकारच्या कर महसुलावर परिणाम होईल, असे "मूडीज'ने म्हटले आहे. 

"मूडीज'ने चालू आर्थिक वर्षासाठी देशाच्या विकासदराचा अंदाज 5.8 टक्‍क्‍यांवरून 5.6 टक्‍क्‍यांपर्यंत आणला आहे. मागील आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 7.4 टक्के होता. सेवा क्षेत्रात मंदीचे वातावरण, गुंतवणुकीत झालेली घट आणि वस्तू आणि सेवांच्या मागणीत झालेली घट आदी कारणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. विकासदर 2020 आणि 2021 मध्ये अनुक्रमे 6.6 आणि 6.7 टक्के राहील, असा अंदाजही "मूडीज'ने व्यक्त केला आहे. 

बेरोजगारीचे प्रमाण वाढले 
भारताचा विकासदर 2018 च्या मध्यापासून 8 टक्‍क्‍यांवरून कमी होत चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत 5 टक्‍क्‍यांपर्यंत घसरला आहे. यामुळे देशात बेरोजगारी प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. देशात आर्थिक अनिश्‍चिततेचा गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे. देशांतर्गत मागणीत घट होत असल्याने अर्थव्यवस्थेसमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत, असे "मूडीज'ने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Moody cuts India GDP growth forecast to 5.6 per cent