'एमएसटीसी'च्या शेअरने केली निराशा; शेअरची 115 रुपयांवर नोंदणी  

वृत्तसंस्था
Friday, 29 March 2019

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या एमएसटीसी लिमिटेडच्या शेअरने गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. शेअर बाजारात एमएसटीसीच्या शेअरची 115 रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीकडून निश्चित करण्यात आलेल्या  120 रुपये या इश्यू प्राइसपेक्षा 7.5 टक्क्यांनी घसरुन शेअरची नोंदणी झाली आहे. नोंदणीच्या पहिल्याच दिवशी कंपनीच्या शेअरने  110.05 रुपयांची नीचांकी पातळी गाठली. 

एमएसटीसी सार्वजनिक क्षेत्रातील ट्रेडिंग कंपनी असून मेटल, मिनरल बरोबरच इतर कमोडिटीमध्ये देखील व्यवहार करते. कंपनीने नुकतेच ई-ऑक्शन देखील सुरु केले आहे. एमएसटीसीच्या नोंदणीबाबत बोलताना सीएमडी बीबी सिंह म्हणले की, '' ई-कॉमर्स व्यवसायात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये कंपनी अधिक नफा कमवेल. 

सध्या  एमएसटीसीचा शेअर (दुपारी 2 वाजून 02 मिनिटे) कंपनीचा शेअर 4.04 टक्क्यांच्या घसरणीसह 115.15 रुपयांवर व्यवहार करतो आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 811.36 कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSTC lists at 7.5 pct discount to issue price of Rs 120