मुकेश अंबानी यांचे वेतन सलग नवव्या वर्षी कायम

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे वेतन सलग नवव्या वर्षी रु.15 कोटी कायम आहे. अंबांनी यांना रु.38.75 कोटी रुपये वेतन मंजूर आहे. मात्र मुकेश अंबानी यांनी वेतन वाढीस नकार देत नवव्या वर्षी देखील रु.15 कोटी वेतन कायम ठेवले आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अंबानी यांनी ऑक्टोबर 2009 पासून स्वत:च्या वेतनाची रु.15 कोटी अशी मर्यादा घालून घेतली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या इतर सर्व संचालक मंडळातील संचालकांचे वेतन वाढले आहे. मात्र अंबानी यांचे वेतन स्थिर ठेवण्यात आले आहे. सध्या अंबानी यांना रु.4.15 कोटी वेतन आणि अन्य भत्ते मिळून वार्षिक रु.15 कोटी वेतन मिळते.

शुक्रवारी, मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1398.50 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात 37.50 रुपयांनी म्हणजेच 2.60 टक्क्यांनी वधारून बंद झाला. सध्याच्या बाजारभावानुसार कंपनीचे बाजारभांडवल रु.455,103.46 कोटींवर पोचले आहे.

Web Title: Mukesh Ambani did not take pay hike for last 9 years: Here's a message for top IT bosses