कोरोना’चा परिणाम; अंबानींनी गमावले ५ अब्ज डॉलर

कोरोना’चा परिणाम; अंबानींनी गमावले ५ अब्ज डॉलर

मुंबई  - चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरातील प्रमुख शेअर बाजारांसह देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली आहे. याचा फटका आघाडीच्या अनेक उद्योगपतींना बसला असून, कंपन्यांच्या समभागात घसरण झाल्यामुळे मागील दोन महिन्यांत त्यांच्या संपत्तीतही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत तब्बल ५ अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांच्या संपत्तीत ८८.४ कोटी डॉलरची आणि विप्रोचे अझीम प्रेमजी यांच्या संपत्तीत ८६.९ कोटी डॉलरची घट झाली आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत ४९.६ कोटी डॉलरची घसरण झाली आहे. फक्त दोन महिन्यांत ही घसरण झाली आहे. कोटक महिंद्रा बॅंकेचे उदय कोटक आणि सन फार्माचे दिलीप संघवी यांच्याही संपत्तीत घसरण झाली आहे. यातील मोठ्या प्रमाणात घसरण ही मागील १५ दिवसांमधील आहे. सेन्सेक्‍समध्ये ११ सत्रांत सुमारे ३ हजार अंशांची घसरण झाली आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी ११.५२ लाख कोटी रुपये गमावले आहेत.

रिलायन्सच्या समभागात झालेल्या घसरणीमुळे रिलायन्स समूहाचे बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात घटले आहे. रिलायन्स समूहातील कंपन्यांचे बाजारमूल्य १३ ते २७ फेब्रुवारीदरम्यान ५३ हजार ७०६ कोटी रुपयांनी घटले आहे. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग राष्ट्रीय शेअर बाजारात १ हजार ३३७ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करीत आहे. रिलायन्स समूहाचीच एक उपकंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रिअल इन्फ्रास्ट्रक्‍चरला याचा सर्वांत मोठा फटका बसला आहे. या कंपनीच्या समभागात १२ फेब्रुवारीपासून १३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या इतर कंपन्यांच्या समभागातही मोठी घसरण झाली आहे. 

टाटा समूहाचे बाजारमूल्य ४१ हजार ९३० कोटी रुपयांनी घसरले आहे. अदानी समूहाचे बाजारमूल्य २७ हजार १०१ कोटी रुपयांनी, तर आदित्य बिर्ला समूहाचे बाजारमूल्य १७ हजार ५३४ कोटी रुपयांनी घसरले आहे. याशिवाय, वाडिया समूहाच्या बाजारमूल्यात ३ हजार २७२ कोटी रुपयांची आणि इंडिया बुल्सच्या बाजारमूल्यात ३९१ कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

संपत्तीतील घसरण (आकडे डॉलरमध्ये) 
मुकेश अंबानी - ५ अब्ज
कुमार मंगलम बिर्ला - ८८.४ कोटी
अझीम प्रेमजी - ८६.९ कोटी
गौतम अदानी - ४९.६ कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com