अनिल अंबानींची दिवाळखोरीत गेलेली आरकॉम मुकेश अंबानी खरेदी करणार

Mukesh Ambani purchase Reliance communication from Anil Ambani
Mukesh Ambani purchase Reliance communication from Anil Ambani

मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी हे त्यांचे भाऊ व रिलायन्स कम्युनिकेशनचे सर्वेसर्वा यांच्याकडून रिलायन्स कम्युनिकेशन कंपनी विकत घेणार आहेत. दिवळखोरीत गेलेली ही कंपनी विकण्याचा निर्णय अनिल अंबानींनी घेतला आहे. 

कर्जबाजारी अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि तिच्या उपकंपन्यांच्या विक्रीच्या प्रस्तावास स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाने परवानगी दिली आहे. विविध बॅंकांना आणि वित्तसंस्थांना रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या आणि तिच्या उपकंपन्यांच्या मालमत्तेच्या विक्रीतून 23,000 कोटी रुपयांच्या थकित कर्जाच्या वसूलीची अपेक्षा आहे.

यामध्ये रिलायन्स कम्युनिकेशन्स, रिलायन्स टेलिकॉम आणि रिलायन्स इन्फ्राटेल यांचा समावेश आहे. दिल्लीस्थित युव्ही अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने (युव्हीएआरसी) रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि रिलायन्स टेलिकॉमच्या मालमत्तांसाठी 14,700 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. तर मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने रिलायन्स इन्फ्राटेलच्या टॉवर आणि फायबर मालमत्तेसाठी 4,700 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. आरकॉमच्या कमिटी ऑफ क्रेडिटर्सच्या (सीओसी) झालेल्या बैठकीत युव्हीएआरसी आणि रिलायन्स जिओ या दोन कंपन्यांचे प्रस्ताव सर्वाधिक मूल्याचे प्रस्ताव ठरले आहेत. स्टेट बॅंकेने आरकॉमच्या विक्रीतून भांडवल उभारण्याच्या योजनेस मंजूरी दिली आहे.

आरकॉमच्या मालमत्तेच्या विक्रीसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठीची सीओसीची बैठक सुरू झाली आहे. आरकॉमशी संबंधित प्रस्तावावर मतदान होणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सवर 33,000 कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर आहे. तर विविध बॅंका आणि वित्तसंस्थांनी मात्र 49,000 कोटी रुपयांचे कर्ज थकल्याचा दावा केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com