अनिल अंबानींसाठी मुकेश अंबानींनी काय केले ते वाचाच...

वृत्तसंस्था
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

मुंबई: अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनची (आरकॉम) उपकंपनी असलेल्या रिलायंस इन्फ्राटेलच्या खरेदीसाठी मुकेश अंबानी यांच्या जिओने सर्वाधिक 3,600 कोटींची बोली लावली आहे. दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत रिलायंस इन्फ्राटेलच्या मोबाइल टॉवर आणि ऑप्टिकल फायबर ऍसेट्सची विक्री केली जाणार आहे. यासाठी भारती एयरटेलने देखील 1,800 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. या व्यतिरिक्त व्हीएफएसआई होल्डिंग्स आणि यूव्ही ऍसेट्स रिकंस्ट्रक्शन लिमिटेडने देखील बोली लावली आहे.

भारती एअरटेलने दिलेला प्रस्ताव काही अटी आणि शर्थींसह दिल्याने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या (एनसीएलटी) वेळेच्या मर्यादित हा व्यवहार पूर्णत्वास जाणे शक्य होणार नाही. एनसीएलटीने दिवाळखोरीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 10 जानेवारी 2020 ची वेळमर्यादा ठेवली आहे. आरकॉमवर 33 हजार कोटी रुपयांचे सिक्युअर्ड कर्ज आहे. तर,कर्जदारांनी ऑगस्टमध्ये 49,000 कोटी रुपयांचे दावे केले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukesh Ambani Reliance Jio may bag RCom tower and fibre assets