एका वर्षात 1 लाखाचे 70 लाख, कोणता आहे स्टॉक ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Multibagger stock

एका वर्षात 1 लाखाचे 70 लाख, कोणता आहे स्टॉक ?

शेअर बाजारात यावर्षी मल्टीबॅगर स्टॉकची संख्या मोठी आहे. इकेआय एनर्जी सर्व्हिसेसचे (EKI Energy Services) शेअर्स त्यापैकीच एक आहेत. इकेआय एनर्जी सर्व्हिसेसचे (EKI Energy Services) शेअर्स IPO द्वारे मार्च 2021 मध्ये 102 रुपयांना ऑफर करण्यात आले होते. इकेआय एनर्जी सर्व्हिसेसचे शेअर्स 7 एप्रिल 2021 रोजी BSE वर 140 रुपये प्रति शेअर या दराने लिस्ट झाले. ज्यांनी हे शेअर्स घेतले त्यांना लिस्टींगवेळीच जळपास 37 टक्के फायदा झाला.

हेही वाचा: LICची जीवन प्रगती पॉलिसी, सविस्तर जाणून घेऊयात…

दुसरीकडे, दमदार लिस्टींगनंतर, बीएसई एसएमई एक्सचेंजवर इकेआय एनर्जी सर्व्हिसेसच्या (EKI Energy Services) शेअरची किंमत 147 रुपयांवर बंद झाली. तर नुकताच इकेआय एनर्जी सर्व्हिसेसच्या (EKI Energy Services) शेअरची किंमत प्रति शेअर 7200 रुपये आहे. याचा अर्थ स्टॉक त्याच्या लिस्टिंगच्या सुमारे एका वर्षात त्याच्या 102 रुपयांच्या इश्यू किमतीवरून 7200 रुपयांपर्यंत वाढला आहे. याचा अर्थ असा की त्याच्या गुंतवणूकदारांना एका वर्षात सुमारे 6900 टक्के परतावा मिळाला आहे.

7 एप्रिल 2022 रोजी इकेआय एनर्जी शेअरची किंमत बीएसई एसएमई एक्सचेंजवर 37 टक्के प्रीमियमवर लिस्ट करण्यात आली. त्यानंतर हा शेअर सतत वाढत आहे आणि 2021 मध्ये शेअर बाजारातील मल्टीबॅगर स्टॉक ठरला. जानेवारी 2022 मध्ये हा शेअर 12,599.95 रुपयांवर अर्थात सर्वकालीन उच्चांकावर (All Time High) गेल्यानंतर कंसोलिडेशन दिसत आहे.

हेही वाचा: Gold-Silver Price: सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

मल्टीबॅगर स्टॉक गेल्या एका महिन्यात 6 टक्क्यांहून अधिक घसरला आहे, तर या वर्षी आतापर्यंत तो 30 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. पण त्याचवेळी गेल्या 6 महिन्यांत हा शेअर सुमारे 5450 रुपयांवरून 7200 रुपयांपर्यंत वाढला असून, त्यात 32 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, त्याचा IPO लाँच झाल्यापासून, BSE वर हा मल्टीबॅगर स्टॉक 102 रुपयांवरून 7200 रुपयांळीवर गेला. या स्टॉकमध्ये जवळपास एक वर्षाच्या कालावधीत सुमारे 6900 टक्के वाढ झाली आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने महिन्याभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख रुपये आज 94,000 रुपये झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 1 लाख रुपये 1.32 लाख झाले असते. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने लिस्टिंगनंतरही 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्या 1 लाख रुपयांचे 70 लाख झाले असते.

हेही वाचा: चहा सोडा आणि कोट्यधीश व्हा, कसं जाणून घ्या…

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Multibagger Stock Rises From Rs 102 To Rs 7200 1 Lakh Rupees In One Year Turned To 70 Lakhs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Share Market
go to top